Download App

‘हाच पॅटर्न भाजपात रुजला’; पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाईवरून सुळेंचा घणाघात

Supriya Sule : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईवरून खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. या संदर्भात सुळे यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहीली आहे. जुन्या हिंदी सिनेमातील गाणे अपनों पे सितम, गैरों पे करम या गाण्याची आठवण यावी, अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतोय याचे उदाहरण द्यायचे झाले तर पंकजा मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे दिले पाहिजे.

राज्यातील नेते कोंडी करताय का ? पंकजा मुंडे म्हणतात, मी ज्योतिषाला विचारून…

इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला. परंतु, यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे, कोट्यावधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याच समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही.

नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्यांची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे, असे खासदार सुळे म्हणतात.

तर मी तिच्या बाजूने खंबीर उभी राहिल

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीला तुम्ही कसेही वागाल? हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीर उभी राहिल, असेही सुळे म्हणाल्या.

Tags

follow us