राज्यातील नेते कोंडी करताय का ? पंकजा मुंडे म्हणतात, मी ज्योतिषाला विचारून…

  • Written By: Published:
राज्यातील नेते कोंडी करताय का ? पंकजा मुंडे म्हणतात, मी ज्योतिषाला विचारून…

पुणेः भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई झाली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यावरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी राज्यात काढलेल्या यात्रेमुळेच भाजपकडून (BJP) ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांचा आहे. तर पंकजा मुंडे या पुण्यात गणपती दर्शनासाठी आल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी कारखान्यांची जप्तीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील भाजप नेते कोंडी करताय का ? यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना मी ज्योतिषाला विचारून सांगते. मी कोंडी होण्याएेवढी लहान नाही. संघर्षातून सुंदर मार्ग काढेल, असे म्हटले आहे.

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

जप्तीची कारवाईबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, अशी घटना दोन-तीन महिन्यांपूर्वी घडली आहे. आताही घडली आहे. आम्ही सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. तो उद्योग नुकसानीत आहे. आठ-दहा वर्षांच्या दुष्काळामुळे कारखाना बँकेकडे गहाण आहे. जे आकडे सांगितले जात आहेत. ते व्याजाचे आकडे आहेत. चुकीच्या पद्धतीने काही झालेले नाही. कारखाना नुकसानीत होता. तरीही शेतकऱ्यांना देणे अदा केले आहे. यंदा कारखाना ऊसाअभावी आर्थिक परिस्थितीमुळे बंद होता.

Rohit Pawar : रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; नगरपाठोपाठ पुण्यातही झळकले बॅनर…


आर्थिक मदत मिळाली असती तर ही वेळ…

कारखानाला केंद्राकडून मदत झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील आठ-नऊ कारखाने दिल्लीमध्ये केंद्राकडून मदतीसाठी गेले होते. प्रस्तावात माझे नावही होते. त्यात मी सोडून इतर कारखान्यांना आर्थिक मदत मंजूर झाली आहे. ती मदत मंजूर झाली असती तर ही वेळ आली नसती, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजपमधून डावलले जात आहे का ? अस विचारल्यावर मी काही याबाबत सांगू शकत नाही. मुंडे साहेबांनी कारखाना हलाखीत उभा केला. कोविडमध्ये नाकातोंडात पाणी गेले. तेव्हा बँकेकडे गेले. माझ्या कारखानाही संघर्षातून मार्ग काढेन. चुकीच्या गोष्टी करणार नाही. लोकांसाठी राजकारण करत आहे. मी फक्त संघर्षकन्या नाही तर सहनशील कन्या आहे, असे मुंडे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube