Rohit Pawar : रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; नगरपाठोपाठ पुण्यातही झळकले बॅनर…
Mla Rohit Pawar : राज्यात आत्तापर्यंत राजकीय नेत्यांचे अनेकदा ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनरबाजी केल्याचं दिसून आलं आहे. बॅनरबाजीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायमच जुंपत असते. याच बॅनरबाजीमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचाही नंबर लागला आहे. येत्या काही दिवसांत रोहित पवारांचा वाढदिवस असल्याने रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे.
‘मी चांगल्या भावनेने फोटो शेअर केला..,’;शरद पवारांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण…
अहमदनगरमधील जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये आमदार रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेतच विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी
आमदार रोहित पवार यांचे बॅनरच फक्त अहमदनगरमध्येच नाहीतर पुण्यात झळकल्याचं दिसून आले आहेत. पुण्यातील मावळमधील टोलनाक्यावरही रोहित पवारांचे असे बॅनर लागले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आमदार रोहित पवारांनी लक्ष घातलं असून, दौरे करायला सुरुवात केलीय. आमदार रोहित पवारांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळं मावळातील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहे.
Horoscope 25 September 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर कर्जत जामखेडमधून पहिल्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा मोठा सत्तेत सामिल झाल्यानंतर रोहित पवार यांनीही शरद पवारांसोबत राज्यभर दौरा केल्याचं पाहायला मिळालं होतं.
दौऱ्यात रोहित पवारही विरोधकांवर चांगलीच टीकेची तोफ डागत असल्याचं बघायला मिळाले होते. या दौऱ्यादरम्यान, रोहित पवार यांनी राज्यभर आपले समर्थकांची फळीही तयार केल्याचं मानलं जात आहे. अशातच आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी होत असल्याने पवार कुटुंबातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जात असल्याचं बोललं जात आहे.