Download App

‘…तर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफीची’; सुप्रिया सुळेंनी ठणकावूनच सांगितलं

Supriya Sule News : आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही सरसकट कर्जमाफी असेल, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule News ) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादीच्या (Ncp) नेतृत्वाखाली तीन दिवसीय शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे बडे नेते सामिल झाल्याचं पाहायला मिळालं. या मोर्चादरम्यान सुप्रिया सुळेंनी संवाद साधला आहे.

एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांना मोठे यश: तब्बल 35 मुलींची सुखरुप सुटका

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात सर्वत्रच दडपशाहीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपलं सरकार हे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन तत्वांवर चालणार आहे. राज्यातील मायबाप जनतेची सेवा, महिलांचा सन्मान, आणि शेतकऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा स्वाभिमान. आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Ayodhya : श्वेत की श्याम…मंदिरात कोणता राम विराजमान होणार? जाणून घ्या, तीन मूर्तींची खासियत

सध्या काही जण तिकडं विकासासाठी गेले आहेत, तर मग शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही. आजच बातमी वाचली की शेतकऱ्यांचा कांदा एक रुपयांना जात आहे. शेतकऱ्यांवर ढसाढसा रडण्याची वेळी आलीयं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आम्हाला आता बघवत नाहीत. त्यासाठीच शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप

केंद्र सरकार आणि ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे. आज शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. कांद्या निर्याती बंदी घालून सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला.अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान जालं. दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही.

चहा विकणाऱ्यांना देश विकताना रेडहॅन्ड पकडलंय! कन्हैय्या कुमारचा पीएम मोंदींवर हल्लाबोल

मोदी सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्या विरोधात आवाज उठवला म्हणून आमचे लोकसभेतून निलंबन झाले. परंतु, आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवणार आहोत,असं सुळे म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही त्यांचे अतिथी देवो भव म्हणून स्वागत करू. नाशिकमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचे हाल त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

follow us