अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनादरम्यान आवाज उठवल्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात आले पण आता पुन्हा राजरोजपणे सुरु झाले असून यामागे सत्ताधारीच असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आता पेनड्राईव्हद्वारे अवैध धंद्यांची माहिती पाठवली असल्याचंही खडसेंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता तरी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई होणार का? असा सवाल खडसेंनी केला आहे.
अयोध्या विमानतळाचं नाव बदललं; ‘महर्षी वाल्मिकी’ नावाने ओळखले जाणार
एकनाथ खडसे म्हणाले, मुक्ताईनगरमध्ये चक्री, पन्नी, दारु, गुटखाची मोठी तस्करी आणि दोन नंबरचे धंदे सुरु असल्याचं मी सभागृहात देवेंद्र फडणवीसांना खडसेंनी सांगितलं होतं. त्यावर फडणवीसांनी मला पुरावे मागितले होते. मी त्यांना अवैध धंदेवाल्यांबाबत माहिती दिल्यानंतर पुराव्याची गरजच काय? असंही ते म्हणाले आहेत. तसचे आता मी मुक्ताईनगरमधील अवैध धंद्यांबाबतची माहिती पेनड्राईव्हमध्ये गृह खात्याकडे पाठवली असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.
अधिवेशन सुरु असताना धंदे बंद झाले पण आता राजरोसपणे हे अवैध धंदे पुन्हा सुरु झाले आहेत. पोलिसंकडे तक्रार केल्यास पोलिस लगेच अवैध धंदेवाल्यांना कळवतात. त्यानंतर अवैध धंदेवाले पत्रकारांनाही धमकी देतात ज्याने व्हिडिओ टाकला त्याला धमकी देतात स्वत: पोलिसचं त्यांना माहिती देतात, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Ranbir kapoor : रणबीर कपूरला ख्रिसमस पार्टी भोवली; ‘त्या’ कृत्यामुळे पोलिसांत तक्रार
हप्ता घ्यायच्या वेळी त्यांना पुरावे लागत नाहीत. हे अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत. लोकांच्या काही तक्राहीही येतात पण शासन अवैध धंद्यांवाल्यांकडून हफ्ते घेतात. सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचे हे अड्डे असून पोलिसही त्यांच्यावर काही कारवाई करीत नाही. जिल्हाभरातून एक ते दोन कोटी रुपये हप्ता डीएसपीकडे जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, अवैध धंद्यांविरोधात मी अनेकदा आवाज उठवला पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा, लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद आहे. त्यामुळेच पोलिस कोणतीही कारवाई करत नाही. जळगावची पोलिस यंत्रणा अकार्यक्षण आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.