अयोध्या विमानतळाचं नाव बदललं; ‘महर्षी वाल्मिकी’ नावाने ओळखले जाणार

अयोध्या विमानतळाचं नाव बदललं; ‘महर्षी वाल्मिकी’ नावाने ओळखले जाणार

Ayodhya Airport : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir) करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसर उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून हा सोहळा दिवाळीसारखा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच आता अयोध्य विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे.. आता यापुढे अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ नावाने ओळखले जाणार आहे. याआधी विमानतळाचं नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होतं. आता हे नाव बदलण्यात आलं आहे.

राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला नवीन रेल्वे स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी विमातळाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधीच रेल्वे स्थानक आणि विमातळाचे नाव बदलण्यात आलं आहे.

‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका

यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मागणीवरुन रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलं आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असून या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 1450 कोटी रुपयांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. या विमानतळावर दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सेवा देण्याची योजना आखण्यात आली आहे.

ठाकरे गटाची 23 जागांची मागणी कॉंग्रेसनं फेटाळली! जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी?

येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही. राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.

Priyanka Gandhi यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रींगप्रकरणी ईडी चार्जशीटमध्ये आलं नाव

14 जानेवारीला संक्रांतीनंतर 10 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube