ठाकरे गटाची 23 जागांची मागणी कॉंग्रेसनं फेटाळली! जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी?

ठाकरे गटाची 23 जागांची मागणी कॉंग्रेसनं फेटाळली! जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी?

Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. ठाकरे गटाला 23 जागा दिल्या तर मग आम्हाला खाली काय राहणार असा थेट सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बैठकीआधीच जागावाटपावरुन खटके उडायला लागले आहेत. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

कॅनडा पोलिसांचा खुलासा, निज्जरचे मारेकरी कॅनडामध्येच लपलेले, लवकरच अटक होण्याची शक्यता

आज नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त है तैयार हम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम म्हणजे लोकसभेचं एकप्रकारे बिगूल वाजवणार असल्याचं यावेळी संजय निरुपम यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुका म्हणजे देशाच्या भवितव्यासाठी महत्वाच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून एकमेकांचे मतभेद विसरुन भाजपविरोधात एकजुटीने उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ST बॅंकेच्या संचालक पदावरून सौरभ पाटलांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्तेंचे बॅंकेवरील वर्चस्व संपुष्टात!

महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या जागावाटपासंदर्भात बैठक उद्या होणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, कॉंग्रेस आणि बहुतेक प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष एकत्र लढणार असल्याचे यावेळी निरुपम यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक पक्षाला काहीतरी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने तशी तडजोड करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

त्यामुळे सर्वांनी एका ठिकाणी बसून त्या त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार त्या ठिकाणी देऊन आपापसात भेटून बोलून ठरवणार असल्याचेही यावेळी निरुपम यांनी सांगितले. मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कॉंग्रेसची सीट आहे आणि ती आपण सोडणार नसल्याचे यावेळी निरुपम यांनी सांगितले.

त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाने 23 जागा मागितल्या आहेत. त्यावर ठाकरे गटाला जर 23 जागा दिल्या तर उर्वरीत कॉंग्रेस आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील? बाकी पक्षांनी काय करायचं असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या बैठकीआधीच खडके उडायला लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube