Supriya Sule : कमी बोलायचं अन् कान उघडे ठेवायचे; खासदार सुप्रिया सुळेंकडून भाच्याला कानमंत्र…

लोकसभा, राज्यसभेत कमी बोलायचं अन् कान उघडे ठेवायचे, असा कानमंत्री सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना दिला आहे.

Untitle (14)

Untitle (14)

Supriya Sule : राज्यसभेच्या सात जागांसाठी महायुतीकडून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवारांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीयं. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बोलताना भाचा पार्थ पवार यांना कानमंत्र दिलायं. लोकसभा, राज्यसभेत कमी बोलायचं अन् कान उघडे ठेवायचे, असा कानमंत्री सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना दिला आहे.

मोठी बातमी : संसदीय प्रवास सुरू करतोय, नितीश कुमार यांचं ट्विट; बिहारमध्ये खांदेपालट निश्चित

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभा, राज्यसभेत कान उघडे ठेवायचे कमी बोलायचं. जेव्हा बोलायची संधी येईल, तेव्हा अभ्यासपूर्ण बोलायचं कारण संपूर्ण देश आपल्याकडे पाहत असतो. शरद पवारांनी मला ही गोष्ट सांगितली होती ती मी आवर्जून सांगेल. जुन्या संसदेत जात असताना पवार म्हणाले ही शिडी जी चढते आहेस ना ही फक्त बारामती मतदारसंघामुळेच. ही शिडी चढायची संधी मिळालीयं जेव्हा चढतील तेव्हा जाणीव ठेव. बारामतीच्या जनतेशी प्रामाणिक राहीली तरच तू ही शिडी चढू शकशील. संसदेत जो कोणी जातो तेव्हा ही संधी कोणामुळे मिळाली याची जाणीव आम्ही ठेवतो. एक आत्या म्हणून सहकारी म्हणून मी प्रत्येकाला सांगत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

नुकत्याच नगरसेविका झालेल्या आदिवासी महिलेला भाजपकडून राज्यसभेवर संधी; कोण आहेत मायाताई इवनाते?

तसेच राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होणे चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे आभार मानते. आज संध्याकाळी मी ठाकरे कुटुंबियातील सदस्यांना भेटून आभार मानणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.

पुण्यातील खराडीत 11 लाख स्क्वेअर फूट जागेची मेगा डील; 1,000 कोटींची ऑफिस स्पेस विक्री

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली असून त्या म्हणाल्या, दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे, कारण अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता सध्या अस्वस्थ आहे, असं सुळे म्हणाल्या आहेत.

Exit mobile version