Supriya Sule On BjP : भाजपने आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सिद्ध करा नाहीतर माफी मागा, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी भाजपला धमकावूनच सांगितलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्योराप केले जात आहेत. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी आरोप सिद्ध केले नाहीतर भाजपला माफी मागण्यास सांगितलं आहे. सुळे पुण्यातील आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
Club 52 Teaser: ‘तुझ्या पिसलेल्या पत्त्यात तुझाच डाव उधळणार’, ‘क्लब 52 ‘चा धमाकेदार टीझर रिलीज
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपमध्ये जोपर्यंत सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींसारखे नेते होते तोपर्यंतच भाजप पक्ष होता. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवला. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, आज ना खाऊंगा ना खाने दुंगाचे काय झालं? आमच्यावरील आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’च्या पोस्टरचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण
तसेच समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यंच्यावर आरोप केलं त्याचे काय झालं? मी जे करते ते खरं करते खोटे आपल्याला जमत नाही. नवाब मलिक, संजय राऊत, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांनी काय केलं. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची इमानदारी आहे. आम्ही सत्तेत असताना विकास कामे करताना चार पट दर द्यायचा निर्णय आम्ही घेतला. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला नाही चित केलं तर नाव सुप्रिया सुळे सांगणार नाही, असंही सुळे म्हणाल्या आहेत.
मोदींचं नाव घेतलं नाही तरीही का झोंबलयं? ‘पनौती’ वरुन नाना पटोलेंचा भाजपला सवाल
महागाईवरुन हल्लाबोल :
देशात आज महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुधाला, ऊसाला, कांद्याला हमीभाव नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केलं. विकास झाला पण यांचा झाला यांचे सगळे वाढले पण सर्वसामान्य लोकांना काय मिळाले. मला वाटलं होतं सगळं संपले पण लढायला मजा येते. माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही. बर झाला मला चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केलं गल्लत होते असे आज होताना दिसत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आज विविध मुद्द्यांवरुन भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून भाजपचे नेते सुळेंच्या टीकेवर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.