NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळतो आहे. यामध्ये अजित पवारांसोबत गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील शरद पवार व त्यांच्या गटाचा रोष दिसून येत आहे. शरद पवारांनी नुकतीच भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथे जाहीर सभा घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. ( Chhagan Bhujbal On Sharad Pawar )
तुम्ही 2024 सालची विधानसभेची निवडणूक लढवणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर का नाही म्हणत भुजबळांनी उत्तर दिले. तसेच माझ्या पुतण्या जेव्हा मला सांगेल की तुम्ही थांबा त्या क्षणाला मी थांबेल, असे म्हणत भुजबळांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.
Eknath Shinde : आमची युती 25 वर्षांची राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागेल….
5 जुलैच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. आता तुमचं वय 82 झालं, 83 झालं तुम्ही थांबणार आहात की नाही. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं काही चुकलं तर आम्हाला सांगा, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवार निवृत्त का होत नाही, असे म्हटले होते.
काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट
दरम्यान, त्यानंतर या दोन्ही गटामध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्यागटाकडून अजित पवारांच्या साथीदारांना लक्ष करण्यात येत आहे. यात छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी सभा घेतली व माझी चूक झाली म्हणत मी माफी मागतो, असे ते म्हणाले. यावर भुजबळांनीदेखील तुम्ही किती ठिकाणी माफी मागाल असा टोला पवारांना लगावला.