वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल; अजितदादांना पवारांनी ठणकावलं

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासह आपले पुतणे अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा थेट इशारा त्यांनी आपले पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. या भाषणात पवारांनी आपण येथे माफी मागायला आलो आहोत, कारण माझा अंदाज चुकला, असे म्हणत भुजबळांवर […]

Letsupp Image   2023 07 08T184951.057

Letsupp Image 2023 07 08T184951.057

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासह आपले पुतणे अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा थेट इशारा त्यांनी आपले पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. या भाषणात पवारांनी आपण येथे माफी मागायला आलो आहोत, कारण माझा अंदाज चुकला, असे म्हणत भुजबळांवर देखील निशाणा साधला. (Sharad Pawar attack On Ajit Pawar Yevala Speech )

शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात

शरद पवारांनी वयावरून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा थेट इशारा त्यांनी अजित पवारांना दिला. पवार म्हणाले की,  “पुन्हा असा विचार कधी करू नका. धोरणाची टीका करा, कार्यक्रमाची टीका करा, पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला कोणी शिकवलेल्या नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी आम्ही लोक वाढलो आणि त्या विचारांमध्ये व्यक्तिगत उल्लेख, व्यक्तिगत हल्ले या गोष्टी कधीही झालेल्या नाही. आमची समस्या एकच आहे ज्या जनतेने आमच्यावर विश्वास टाकला त्या जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. जर अशी गोष्ट कोणी करत असेल तर त्यांना याची किंमत आज नाहीतर उद्या द्यावी लागेल तो इतिहास येथे घडेल याची खात्री मी व्यक्त करतो.”

मी पक्षात कोणते पद मागितले?; येवल्याच्या सभेतून सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार

अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी सरळ सरळ लढाई सुरू झाली आहे. या लढाईची सुरुवात शरद पवार यांनी आज छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून सुरू केली. 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी तुम्ही जर सभा घेतल्या तर 6 दिवसांनी मला देखील तिथे  सभा घ्यावी लागेल ,असा इशारा दिला होता. त्यामुळे आता पवारांच्या या जाहीर सभेला अजित पवार सभा घेऊन उत्तर देणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version