NCP Sharad Chandra Pawar : निवडणूक आयोग आणि EVM च्या विरोधात मारकडवाडी गावाचे सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाच्या वतीने आज प्रदेश कार्यालयाच्या समोर निवडणूक आयोगा (Election Commission) विरोधात आणि मारकडवाडीतील (Markadwadi) जनतेच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांच्या नेतृत्वात साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवक्त्या तथा माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) उपस्थित होत्या.
आंदोलनादरम्यान मारकडवाडीच्या समर्थनात विविध घोषणा देण्यात आल्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मारकडवाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार महादेव जानकर विजय झाले आहे. मात्र त्यांना त्यांच्या गावांमधून मिळालेले मत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेऊन ही निवडणूक मतपत्रिकेतून घेण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाकडून कुठलाही सकारात्मक पाऊल उचलण्यात न आल्याने अखेर त्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी WE support… मारकडवाडी, व्यवस्था लोकांसाठी की ..लोक व्यवस्थेसाठी, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. लोकांचा मतदानावरून विश्वास उडणे..हे लोकशाहीसाठी घातक. EVM हटाव…देश बचाव.. मारकडवाडी के सन्मान मे….. हम उतरे मैदान में, इस देश की व्यवस्था किस के लिये..जनता के लिये जनता के लिये अशा विविध घोषणाही देण्यात आल्या.
आंदोलनादरम्यान बोलताना राज राजापूरकर म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालानंतर मारकडवाडी गावातील लोकांनी आपली एकी दाखऊन निवडणुक आयोगाच्या विरोधात उभे राहून त्या गावात पुन्हा बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या म्हणून निवडणूक आयोगाला अर्ज दिला होता, परंतु निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्राला उत्तर न देता लोकशाहीचा अपमान केला आहे. म्हणूनच आम्ही महविकास आघाडी ही मारकडवाडीच्या समर्थनार्थ आणि त्यासाठी राजीनामा देणारे आमचे आमदार उत्तमराव जाणकार यांच्या समर्थनर्थ येणाऱ्या काळात काँग्रेस,शिवसेना,आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच समाजवादी पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून असेच आंदोलन करणार आहोत.
या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.असे राज राजापूरकर म्हणाले. राज राजापूरकर म्हणाले की,निवडणूक प्रक्रियावर जर कोणी आवाज उठवत असेल तर देशाची लोकशाही धोक्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अश्या प्रकारचे आंदोलन आणि लाँग मार्च हे उद्या नवी मुंबई, परवा ठाणे तसेच महाराष्ट्र भर आम्ही आंदोलन करणार आहोत.
या आंदोलना नंतर EVM वर निवडणुक न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या या मागणीचे निवेदन देण्यासाठी आम्ही आणि नवी मुंबई वरून आलेले शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्य निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देणार आहे. असेही राज राजापूरकर यांनी बोलताना म्हटले आहे. यावेळी आंदोलनात मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण , ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापुरकर, सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.