बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक वजन असलेले नेत्यांना ताकद देण्यात येत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मानणारे बबन गित्ते (Baban Gitte) यांनी बीडच्या सभेत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी गित्ते यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे. मुंडेविरोधात ताकद देण्यासाठी बबन गित्ते यांची आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ही नियुक्ती केली आहे. संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण योगदान द्यावे. समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे राबवावीत, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. बबन गित्ते यांची परळीत मोठी ताकद आहे. मागील निवडणुकीत गित्तेंच्या मदतीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला होता.
जळगावच्या प्रसिद्ध व्यासायिकांवर पुण्यात गुन्हा दाखल: कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप
दोन आठवड्यापूर्वी बीडमध्ये शरद पवार यांची जंगी सभा झाली होती. शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्यासाठी बबन गित्ते व त्यांच्या समर्थकांनी एक हजारहून गाड्यांचा ताफा बीडला आणला होता. बबन गित्ते यांचे शक्तिप्रदर्शन जोरदार चर्चेत आले होते. ही ताकद वापरून धनंजय मुंडे यांना खिंडीत गाठता येणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाने) बबन गित्तेंवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून एकप्रकारे मुंडेविरोधात लढण्यासाठी बळ दिले आहे.
शरद पवारांना चिडविण्याचे भाजपचे नियोजन : INDIA बैठकीच्या वेळीच अजितदादांचे NDA मध्ये स्वागत
कोण आहेत गित्ते ?
बबन गित्ते यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम केले आहे. त्यानंतर पंकजा मुंडेंसाठी काम केले आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी धनंजय मुंडेंची साथ दिली. त्यांच्यामुळे धनंजय मुंडे विजयी झाल्याचे गित्ते सांगत आहेत. बबन गित्ते यांची पत्नी या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या आणि सभापती झाल्या. परंतु धनंजय मुंडेंच्या एका गटाने त्यांच्या पत्नीवर अविश्वास ठराव आणून त्यांना हटविले आहे. त्यावरून गित्ते हे नाराज झाले आहे. गित्ते हे वंजारी समाजाचे आहेत. त्यांचे परळीत चांगले वजन आहे. त्यामुळे गित्ते हे भविष्यात शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवारही असू शकता