शरद पवारांना चिडविण्याचे भाजपचे नियोजन : INDIA बैठकीच्या वेळीच अजितदादांचे NDA मध्ये स्वागत
मुंबई :आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला 1 सप्टेंबर रोजीच महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचीही बैठक होणार आहे. (The Mumbai meet of I.N.D.I.A parties will coincide with an NDA meet of ruling coalition in Maharashtra on Friday)
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या मंत्री, आमदारांचे एनडीएमध्ये स्वागत करण्यासाठी ही बैठक होणार आहे. गत महिन्यात 19 जुलैला बंगळुरूमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. त्याचवेळी दिल्लीत एनडीए आघाडीचीही बैठक पार पडली होती. अगदी त्याचप्रमाणे यावेळीही इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत असतानाच एनडीएचीही बैठक होणार आहे.
राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले, “बैठकीत आमचे राज्यातील आघाडीचे सर्व पक्ष यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) सहभागी होतील. मात्र एनडीए इंडिया बैठकीसाठी निवडलेली तारीख यांच्यातील कोणताही संबंध नाही. आमच्या समन्वय समितीने पावसाळी अधिवेशनाच्या आधीपासून आमची बैठक आखली होती. त्यामुळे त्याच दिवशी विरोधी पक्षांचीही बैठक होत असल्याने आम्ही हे करत आहोत असे म्हणण्यात काही अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘महायुती सरकार घरी बसणारं नाहीतर लोकांच्या दारी जाणारं’; शंभूराज देसाईंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबईत इंडियाची बैठक :
मुंबईत ग्रँड हयात इथे इंडियाची तिसरी बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. या दोघांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. दोघांच्या नेतृत्वात बैठकीची तयारी पार पडली. या बैठकीत 26 पक्षांचे 80 नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये एमके स्टॅलिन, नितीश कुमार, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या पाच मुख्यमंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसमधून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल हे उपस्थिती दर्शविणार आहेत.