Harshvardhan Patil : उमेदवार बदलला नाही तर उद्रेक होणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते जिल्हा बॅंकेचे चेअरमन अप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) यांनी दिलायं. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेशादरम्यान, शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना इंदापुरातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आता इंदापुरातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक भूमिक घेण्यात आलीयं. अप्पासाहेब जगदाळे इंदापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, यावेळी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रविण माने यांच्याह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हेंनी आपले रंग दाखवून विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे सिद्ध केले; गोवर्धन परजणेंची टीका
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, सध्या इंदापुरात काय चाललंय काहीच समजत नाहीये. लोकं म्हणतात, आजी नको माजी नको तरीही त्यांनाच बोलावलं जात आहे. आमच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नसून आम्ही कधीच निवडणुकीत पैसे घेतलेले नाहीत. तरीही आमच्यावर अन्याय होतोयं ही आमची खंत असून वरिष्ठांनी आमची मागणी मान्य केली नाही तर इंदापुरात उद्रेक होणार असल्याचा इशारा जगदाळे यांनी दिला आहे.
तसचे राजकारणात कोण आमदार होतं, याला महत्व नाही पण लोकांची सेवा एकनिष्ठेने 25 वर्षांपासून आम्ही करतोयं, जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही, त्याच त्याच माणसाला का न्याय देत आहात. हा विषय भावनेचा आहे, अन्यायाचा आहे किती दिवस सहन करायचा. पक्षाला आम्ही 11 तारखेपर्यंत थांबलोयं
शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलायं, आम्ही पक्ष सोडण्यासाठी ही प्रेस घेतलेली नाही, आमची मागणी मान्य करावीच लागेल नाहीतर इंदापुरात उद्रेकच होईल याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील, असा थेट इशारा जगदाळे यांनी दिला आहे.