‘माविआ’ 183 जागा जिंकणार अन् महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत

‘माविआ’ 183 जागा जिंकणार अन् महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत

Prithviraj Chavan : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections) जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे आणि पुढील काही दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप जाहीर करण्यात येणार आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत 183 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे. ते आज कराडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. आम्ही लोकसभेमध्ये 65 टक्के जागा जिंकलो. जर या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधानसभा निवडणुकीत 183 जागा जिंकू शकतो तर महायुतीचा विचार केला तर त्यांना विधानसभा निवडणुकीत तीन अंकी संख्याही गाठता येणार असं देखील भाकीत त्यांनी यावेळी वर्तवलं.

तसेच यावेळी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले. मी मुख्यमंत्री असताना मी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं मात्र फडणवीस सरकारला ते टिकवता आलं नाही. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. लोकांच्या हाताला काम नाही. गेल्या दहा वर्षात राज्यात एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आली नाही. जे उद्योग येत होते ते गुजरातला पळवण्यात आले आहेत.असेही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी राज्यात सध्या सामाजिक वातावरण खूप चिंताजनक आहे असं देखील ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात बारा बलुतेदार समाज, मराठा समाज, दलित समाज असे सगळे समाज खेळीमेळीने राहात होते. त्यांच्यात कधीही तेढ निर्माण झाली नव्हती मात्र काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे त्यामुळे आता राज्याचा सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे. दलित समाजात बौद्ध आणि दलित तसंच हिंदू आणि दलित अशी विभागणी करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे.

हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी अन् भारताचा शानदार विजय, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा

निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा गंभीर आरोप देखील या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube