दोन वर्षात लाडकी बहिण आठवली नाही, पण लोकसभेनंतर…; पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांना टोला

दोन वर्षात लाडकी बहिण आठवली नाही, पण लोकसभेनंतर…; पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांना टोला

Prithviraj Chavan : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki bahin Yojana) सुरू केली. या योजनेला संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात सुमारे 1 कोटी 5 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. दरम्यान, या योजनेवरून आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला.

महाराष्ट्रात CM पदाचा चेहरा कोण असणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ज्या पक्षाला जास्त…’ 

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्रीपदाविषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही कोणताही चेहरा समोर ठेवत नाही. मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही. कारण, आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. ज्यावेळी आघाडी म्हणून निवडणुक लढवली जाते, त्यावेळी ज्या पक्षाचे आधिक उमेदवार निवडुन येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असा संकेत आहे. मग ते मुख्यमंत्रीपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं, ते त्या त्या पक्षातील नेते ठरवतील, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

Old Money: एपी ढिल्लॉनच्या गाण्यात भाईजानचा जबरदस्त ॲक्शन सीन, संजू बाबाने जिंकली चाहत्यांची मन 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू ठेवण्यासाठी अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडूण आणण्याचं आवाहन केलं. त्याविषयी बोलतांना चव्हाण म्हणाले की, अजित पवारांना त्याच्याशिवाय काही दिसन नाही. दहा वर्षात लाडकी बहिण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कर्नाटक राज्यात आम्ही ही योजना यशस्वीपणे राबवली आहे. दोन हजार रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आम्ही देत आहोत. ही योजना तेलंगणामध्येही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी किती पैसे द्यायचे हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ठरवू, अशी भूमिकाही चव्हाण यांनी मांडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube