Devendra Fadanvis On Sharad Pawar : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठे वक्तव्य केलं. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला. तेव्हा पवार यांनी काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याचे देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. तर दोन्ही नेत्यांची तुलना होऊ शकत नाही असे स्पष्ट केले. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडलीयं. आम्ही कोणाशी तुलना करु इच्छित नाही, तुलना करण्याच कारणच नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
झोपलेल्या वडिलांची डोक्यात दांडा घालून मुलाने केली हत्या, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्डचा भाग आहे की, देशामध्ये इलेक्टेड, निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता. ते 4398 दिवस होते. मोदीजी आता 4399 दिवस झालेत आणि पुढे ते राहणार आहेत. याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाहीये. विषय नाहीये. मुळामध्ये नव्या भारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचे जे स्थान आहे, ते आढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही. तुलना करण्याचं कारण नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंडित नेहरु यांच्या तुलनेनंतर शरद पवार म्हणाले की नेहरूबाबत स्पर्धा लावली जात आहे, पण तशी काय होऊ शकते नेहरूंनी इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याच काम केलं, हे आपण विसरू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
