Download App

अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच नाही पडलं; जयंत पाटलांची खोचक टीका

Jayant Patil News : मोदी सरकारकडून आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे. अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरात काहीच पडलं नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार लाभ?

जयंत पाटील म्हणाले, अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेची निराशा केलीयं. अर्थसंकल्पात महिला, युवक, शेतकरी असे पिल्लर सत्ताधारी आधी विसरुन गेले होते
आधीच्या अर्थसंकल्पात त्यांच्याबद्दल काहीच उल्लेख केला नव्हता. जनतेला मदत करायची असेल तर महागाई कमी पाहिजे. 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं असं म्हणतात पण 80 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य देण्याची घोषणा केली जाते. जगात सर्वाधिक गरीबी आपल्या देशात आहे. महागाईला तोंड देण्यासारखी ठोस घोषणा काही नाही. आयकरातही काहीच बदल केला नाही. महागाईचा दबाव आहे तर देशात कर घेऊन देशाच्या जनतेची पिळवणूकही सुरु आहे. जीएसटी कमी केला असता तर जनतेला मोठा आधार मिळाला असता. महागाई कमी झाली असते. या अर्थसंकल्पात जनतेच्या पदरात काहीच नाही पडलं नसल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

‘फाइटर’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात गाठला कोट्यवधींचा टप्पा

तसेच 2014 साली भ्रष्टाचाराच्या बाबतीत देश 85 व्या स्थानावर होता आता 93 व्या स्थानावर आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे आहे. देशावर 2014 पर्यंत 54 लाख कोटींचं कर्ज होतं. आता ते कर्ज 205 लाख कोटींवर गेलं आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी केली असल्याची शंका असल्याचंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी अजून आरक्षण दिलं नाही…
मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी वेगळ्या समाजाला कसं सांभाळायचं असा आराखडा तयार केला आहे. 16 फेब्रुवारीला जी अधिसूचना काढलीय त्यानंतर लगेच जीआरमध्ये होईल त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. सध्या सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यावर आक्षेप कोणाचे असतील तर चर्चा होईल. आता सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत आज बोलणं अतिघाईचं होईल योग्यवेळी त्यावर भूमिका मांडू पण आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी अजून आरक्षण दिलं नाही, अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे.

follow us