Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार लाभ?

Government Schemes : महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना आहे तरी काय? कोणाला मिळणार लाभ?

Government Schemes : राज्यातील (Maharashtra)ग्रामीण महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने(Government of Maharashtra) नव तेजस्विनी योजना सुरु केली आहे. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) राबवणार आहे. MAVIM हे राज्य महिला विकास महामंडळ आहे. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव तेजस्विनी योजनेच्या (Nav Tejaswini Yojana)माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे 10 लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे.

रोहित पवारांसाठी आता प्रतिभाकाकीही मैदानात : ईडी चौकशीवेळी संपूर्ण पवार कुटुंबाचा भावनिक संदेश

नव तेजस्विनी योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे असणार आहे.
MAVIM ही महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारी आणि SHG महिलांना नोकऱ्या देणारी राज्य-संचालित संस्था आहे.
नव तेजस्विनी योजनेचा सुमारे 10 लाख ग्रामीण कुटुंबांना फायदा होणार आहे.
अशा ग्रामीण कुटुंबांना नव तेजस्विनी ग्रामीण महिला सक्षमीकरण उपक्रमाकडून त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
तेजस्विनी कार्यक्रमामुळे महिलांना कमी व्याजदरात कर्ज मिळण्यासाठी मदत होणार आहे.

विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

योजनेचे फायदे काय मिळणार?
महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना मिळणार आहे.
ही योजना महिला व बाल विकास महामंडळामार्फत राबवली जाणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 10 लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.
महिलांना दारिद्र्यरेषेतून बाहेर पडण्यासाठी या योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली मिळणार आहे.
महाराष्ट्र तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
या योजनेतून ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय निधी (IFAD) 333 कोटी रुपये आणि राज्य सरकार 190 कोटी रुपये देणार आहे.
ही रक्कम ग्रामीण महिला उद्योजकता उभारण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केली जाईल.
राज्यातील ज्या महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आहे, त्यांना या योजनेंतर्गत सहज कर्ज मिळणार आहे.

योजनेसाठी आवश्यक पात्रता
महाराष्ट्र नव तेजस्वी योजनेसाठी लाभार्थी मूळचे महाराष्ट्राचे असणे अनिवार्य आहे.
या योजनेसाठी फक्त राज्यातील महिलाच पात्र असतील.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण महिला या योजनेंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
ओळखपत्र
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर
बँक खाते विवरण

(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज