Shashikant Shinde : सरकार धनगर, मराठा आणि ओबीसी समाजाला फसवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केलायं. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. या मुद्द्यावर शिंदे यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलंय.
शशिकांत शिंदे म्हणाले, लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे.केंद्र सरकारबद्दल जी भावना आधी होती आता हळूहळू बदलत आहे. जरांगे आंदोलनाला बसले लगेच चंद्रकांत पाटलांची समिती स्थापन केली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितच राहिला. आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटलांची समिती स्थापन केली. तुम्ही आरक्षण देणार आहात की नाही? हो नाहीमध्ये उत्तर द्या. केंद्रात राज्यात तुमची सत्ता आरक्षण तुमच्या हातात आहे. सरकार धनगर, मराठा, ओबीसी समाजाला फसवत असल्याचा आरोप शिंदे यांनी केलायं.
मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. विश्वनाथ प्रतापसिंहांनी आयोगाची शिफारस केली. मंडल आयोग पहिल्यांदा महाराष्ट्राने लागू केलं. आत्ता एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणी करतात. मताच्या हव्यासापोटी जातींचं ध्रुवीकरण केलं जातं आहे. विधिमंडळाच्या परिसरात मारामारी करायचं धाडसं होतं आहे. दोन समाजाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन हल्ले करतात, असं सध्याच्या सरकारमध्ये चाललं असल्याचं शिंदेंनी म्हटलंय.
बावनकुळे साहेब दंडाला स्थगिती म्हणजे माफीच; मेघा इंजिनिअरिंगचा हिशेब मांडत रोहित पवारांचा हल्लाबोल
तसेच राष्ट्रवादीकडून ओबीसी यात्रा सुरु करण्यात आलीयं. या यात्रेच्या माध्यमातून आम्ही हे लोकांना समजून सांगत आहोत. या यात्रेला हळूहळू प्रतिसाद मिळेलंच. सध्या तरुणांचा सरकारकडून वापर केला जात आहे. सरकार ज्या त्या जातीच्य तरुणांचा पक्षात प्रवेश करुन घेत त्यांचा वापर करुन घेत असल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय.
अचानक राष्ट्रवादी हा मराठ्यांचाच पक्ष असल्याचं भासवलं जात आहे. शरद पवारांनी कधीच विचारांची प्रतारणा होऊ दिली नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र असून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सरकार विषमता निर्माण करत आहे. याआधी आत्तापर्यंत राष्ट्रवादीला कलंक नव्हता . शरद पवार अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. अचानकपणे हा पक्ष मराठ्यांचा हे दाखवून द्यायचं काम केलं जातं, असल्याचंही ते म्हणाले आहेत.
सरकारचं जीभ हासाडायला लागलं तर सर्वसामान्यांनी काय करावं?
सध्याच्या सरकारमध्ये पोलिस यंत्रणा, आहे की नाही हा प्रश्न पडला असून सत्ताधारी सरकारमधील मंत्रीच वेगळ्या प्रकारची विधाने करीत आहेत. भाजपचे मंत्री नितेश राणेंनी मनोज जरांगेंवर टीका केली. आता सरकारचेच मंत्री जीभ हासाडायला लागले तर सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे? असा थेट सवाल शशिकांत शिंदे यांनी सरकारला केलायं.