Download App

देवदत्त निकम यांचा सनसनाटी विजय; वळसे पाटलांना धडकी

Muncher Apmc Election : राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देवदत्त निकम (Devadatta Nikam) यांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सनसनाटी विजय झाला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या निरगूडसर या गटातूनच निकम यांचा विजय झाला आहे. यामुळे दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर देवदत्त निकम अत्यंत भावनिक झाल्याचे दिसून आले. विजयी झाल्याचे कळताच त्यांना आश्रू अनावर झाले होते.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीवर दिलीप वळसे पाटील यांचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. मात्र निकम यांच्या विजयाने वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली. दरम्यान निकम यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत बंडखोरी केली तरी देखील अद्याप त्यांची हाकालपट्टी केली नाही. यावर वळसे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. येत्या विधानसभेला दिलीप वळसे पाटील यांची आंबेगावमधील सद्दी देवदत्त निकम यांच्यामुळे संपू देखील शकते. यामुळे दोन्ही नेत्यांच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

काकाच्या 40 वर्षांच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग, आमदार क्षीरसागरांची एकहाती सत्ता

देवदत्त निकम म्हणाले की बाजार समितीच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली. एवढं चांगलं कारुन देखील पक्ष उमेदवारी देत नाही म्हणून शेतकरी आणि सर्वचं पक्षाचे नेते माझ्या पाठिशी उभा राहिले. माझ्याकडे कोणतेही नियोजन नव्हते. ध्यानीमनी नव्हते. पण सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मला साथ दिली. मला पाडण्यासाठी खुप प्रयत्न झाले. दोन हजार ते तीन हजार असे रेट ठरले होते.

‘भाकरी फिरवायला काळ, वेळ, वय अन् ताकद लागते’; राणेंचा पवारांना टोला

देवदत्त निकम पुढं म्हणाले की माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी व्हावेत म्हणून मी चप्पल न घालता अनवाणी फिरुन प्रचार केला. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. वळसे पाटील हे माझे दैवत आहेत.यापुढं तुमची वाटचाल काय असेल? या प्रश्नावर निकम म्हणाले की आगामी लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली तर लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी आहे. वेळ येईल त्यावेळी आणखी स्पष्टपणे बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us