‘भाकरी फिरवायला काळ, वेळ, वय अन् ताकद लागते’; राणेंचा पवारांना टोला

‘भाकरी फिरवायला काळ, वेळ, वय अन् ताकद लागते’; राणेंचा पवारांना टोला

Narayan Rane On Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे विधान केले होते. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात आहेत. हा संकेत त्यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलेला होता. पण राज्यामध्ये सुद्धा यातून काही बदल होऊ शकतो का यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. या त्यांच्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

आता म्हणा बदली वगैरे ची ताकद नाही, त्याला वेळ, काळ, वय असतं, असे म्हणत नारायण राणे यांनी शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. यावेळी ते सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रदर्शित  होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व लोकांनी हा कार्यक्रम ऐकावा या त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच यावेळी त्यांनी बारसूच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

‘यह तो सिर्फ झांकी है, आगे…’, खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीला इशारा

शरद पवार यांची भाकरी करपलेली होती म्हणून आम्ही ती बदलली. जनता म्हणाली ही भाकरी करपली आहे. त्यानंतर मग एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ती भाकरी बदलली. आता आम्ही आमची भाकरी टाकली आहे. लोकांना आणखी तिची चव चाखायची आहे. त्यानंतर पवार साहेबांनी यावर बोलावं, असे म्हणत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Rule Change : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

तसेच बारसूच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. कोण विरोधक त्यांचे योगदान काय? किती प्रकल्प त्यांनी कोकणात आणले? विमान, धरण, रेल्वे या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केला. लोकांना रोजगार मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काय केले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष केले आहे, आंदोलकांना मारले याचा पुरावा काय आहे? तुम्ही दाखवा सरकार खोटे बोलत असेल तर, यांना फक्त विरोध करायचा आहे, असे म्हणत राणेंनी ठाकरे यांना सुनावले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube