काकाच्या 40 वर्षांच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग, आमदार क्षीरसागरांची एकहाती सत्ता

काकाच्या 40 वर्षांच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग, आमदार क्षीरसागरांची एकहाती सत्ता

APMC Result : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी अनेक बाजार समित्यांचे निकाल घोषित झाले आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांना फटका बसला आहे. यातच बीडमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. काकांच्या 40 वर्षाच्या सत्तेला पुतण्याकडून सुरुंग लावण्यात आला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. 18 पैकी 15 जागेवर आमदार संदीप क्षीरसागर पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

बीड (Beed) कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. दरम्यान आजच्या या निवडणुकांच्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत. अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहे. यातच बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागर यांचा दणदणीत पराभव केला आहे.

निकालानुसार 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय मिळवत बीड बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकवला आहे. या निकालाने काकाने पुतण्याला धोबीपछाड केल्याचे बोलले जात असून हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती.

दरम्यान, या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली आहे. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते.

ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने राणे पिता-पूत्र पाळलेत; राऊतांचा घणाघात

आरोपांपेक्षा कामाला प्राधान्य दिले
आजचा विजय हा आमचा नसून लोकांचा आहे, लोकांच्या आशीर्वादाने हा विजय मिळाला आहे. निवडणुकीत आरोप -प्रत्यारोप होत असतात. ते आमच्यावर नेहमी आरोप करत असतात. मात्र आम्ही आरोपांपेक्षा बाजार समितीमधील कामांना प्राधान्य दिले. लोकांना देखील आमचा विचार आवडला म्हणून मतदारांनी आम्हाला निवडून दिले अशी प्रतिक्रिया आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube