NDA बैठकीत CM शिंदे अन् अजितदादांची छाप; स्वागत करण्याचा अन् पहिल्या रांगेत उभं राहण्याचा मान

NDA Meeting : राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस-शिंदे सरकारमध्ये नव्याने आलेले अजित पवार यांना सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळाले आहेत. राज्यात दोघांना भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता केंद्रामध्ये भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे आजच्या एनडीएच्या बैठकीतून दिसून येत आहे. आजच्या बैठकीत दोघांनाही पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलेले आहेत. कर्नाटकातील बंगळुरू […]

NDA Meeting

NDA Meeting

NDA Meeting : राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस-शिंदे सरकारमध्ये नव्याने आलेले अजित पवार यांना सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळाले आहेत. राज्यात दोघांना भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता केंद्रामध्ये भाजपकडून मानाचे स्थान देण्यात येत असल्याचे आजच्या एनडीएच्या बैठकीतून दिसून येत आहे. आजच्या बैठकीत दोघांनाही पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलेले आहेत.

कर्नाटकातील बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर सर्वांच्या नजरा आता नवी दिल्लीत सुरू असलेल्या एनडीएच्या बैठकीकडे लागल्या आहेत. या बैठकीत देशातील 38 पक्ष सहभागी झाले आहेत. एनडीएमध्ये नव्यानेच दाखल झालेली शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निमंत्रणापासूनच मानाचे स्थान देण्यात आले आहे.

या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पहार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर सामूहिक फोटोशूट वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. एनडीएच्या निमंत्रण पत्रिकेत देखील दुसऱ्याच नंबरला शिवसेनेचे तर तिसऱ्या नंबरला राष्ट्रवादीचे नाव आहे.

मोदींच्या सेवा सप्ताहानंतर राज्यात साजरा होणारा दादांचा ‘अजितोत्सव’

दिल्लीतील हॉटेल अशोका येथे बैठक सुरु झाल्यानंतर आसनव्यवस्थेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानचे स्थान देण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले होते. यातून भाजपसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महत्व अधोरेखित होते. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात भाजपला नवा जोडीदार मिळाला आहे.

Exit mobile version