मोदींच्या सेवा सप्ताहानंतर राज्यात साजरा होणारा दादांचा ‘अजितोत्सव’

मोदींच्या सेवा सप्ताहानंतर राज्यात साजरा होणारा दादांचा ‘अजितोत्सव’

Ajit Pawar Birthday :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने अजित पवार गटाकडून राज्यभर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे दिसून येते आहे.

यावेळी तटकरे म्हणाले की, “22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने 22 जुलै ते 31 जुलै हा सप्ताह राज्यभरात अजितोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. हा शासकीय कार्यक्रम असणार नाही. हा पक्षाचा कार्यक्रम असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा व तालुका पातळीवर हा कार्यक्रम साजरा करणार आहे.”

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

तटकरे पुढे म्हणाले की, आम्हाला माहिती आहे राज्यभरात आणखी मुबलक पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांवर पेरणी कशी करावी याचे संकट आहे. त्यामुळे सामाजिक कार्यक्रमांच्या द्वारे आम्ही अजितदादांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपकडून देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या काळात भाजपकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अजित पवार आता भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहे. त्यानंतर त्यांच्याकडूनही असाच कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

https://letsupp.com/national/most-controversial-sex-scandals-in-indian-politics-69084.html

यावेळी त्यांना शरद पवार यांची सलग दोन दिवस घेतलेल्या भेटीत काय घडले यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर तटकरे म्हणाले की, पवार साहेब हे आमचे नेते आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी विधासभेचे व विधानपरिषदेचे आमदारांसह आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो.  त्याविषयी प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिल्याचे तटकरेंनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube