Download App

‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा

Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. राज्यात महायुतीला स्पर्धकच नसल्याने महायुती लोकसभेच्या 48 जागा जिंकणार असल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

Shweta Tiwari : श्वेता तिवारीनं अनारकली सूट घालून सोशल मीडियावरचं वाढवलं तापमान

तानाजी सावंत म्हणाले, राज्यात महायुतीसमोर स्पर्धकच नाही, त्यामुळे राज्यातील 48 लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. सध्या निवडणुकांच्या आधीच काही सर्वे येत आहेत. कोण 42 जागा, कोणी 45 तर कोणी 40 जागा सांगतय पण हे काही नाही. अद्याप निवडणूक जाहीर व्हायची आहे आचारसंहिता लागायची आहे. ज्यावेळी विश्वनेते यवतमाळमध्ये सांगतात की ‘अबकी बार चारसो’ पार
त्यावरुन आजच्या मैदानाची साक्ष ठेऊन मी सांगतो यावेळी राज्यात 48 विरोधात शून्य अशी परिस्थिती असणार आहे, हे लक्षात ठेवा, असं तानाजी सावंत यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रातही महायुतीने 45+ चा नारा दिला आहे. अशात आता महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा 45 जागांवर विजय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये हा अंदाज बांधण्यात आला आहे.

झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात 377 आणि महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला देशात 93 आणि महाराष्ट्रात केवळ तीन जागा जिंकता येऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात आला आहे.

दरम्यान, देशात भाजपने 370 आणि एनडीएने 400+ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्रात एकूण 45 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी 48 जागा जिंकणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

follow us