‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला’, नितेश राणेंनी राऊतांना झापले

‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला’, नितेश राणेंनी राऊतांना झापले

Nitesh Rane slapped Sanjay Raut: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये (BJP ) प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी या वृत्ताच खंडन केलं होतं. याबद्दल आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी संजय राऊतांना झापले.

आज सकाळी छत्रपती संभाजीनगर वरून पादर्या पावट्या टरटर करत होता. चपट्या पायाचा संजय राऊत जिकडे पाय ठेवतो तो पक्ष संपलेला आहे. उद्धव ठाकरे, पवार साहेब यांना संपवल्यानंतर आता काँग्रेसला देखील संपवणार हे मी अगोदर बोललो होतो. ह्याला कोणी घरात घेऊ नये. अशा तिखट शब्दात आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना झापले आहे.

2019 पासून लोकमतच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी नासवल असेल तर हे राऊतांनी केले आहे, आरशात पाहिलं असत तर त्याला समजलं असत. महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला. चव्हाण साहेब काही वेळात भाजपात प्रवेश करणार आहेत. आमच्या रस्त्यात जे जे येतील ते नेस्थानाबुत होतील. असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

चांगले बदलच दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची? अशोक चव्हाणांचा खरा राग नाना पटोलेंवरच!

आता वंचित आघाडीकडे संजय राऊतने आपला लक्ष वळविला आहे. जे उद्धव ठाकरे, पवार आणि काँग्रेसला समजलं नाही, ते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखावं आणि आपला पक्ष वाचवावा. ज्यांनी 2019 पासून 10 जनपथवर नवीन मम्मी आहे. अस ज्यांनी सिद्ध केलं आहे त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये. तेव्हा अजित दादा, अशोक चव्हाण हे तेव्हा तुम्हाला चांगले होते. तुमच्या मंत्रिमंडळात होते. आता आमच्या सोबत आल्यावर ते वाईट का? उद्धव ठाकरे संपल्यानंतर आता ह्याचा लक्ष जो बायडन आहे असा टोला यावेळी नितेश राणेंनी लगावला.

राणे साहेबांनी काँग्रेस सोडताना भावना व्यक्त केल्या होत्या. ते स्वतःच्या आमदाराला किती महत्व देतात हे मी बघितला आहे. राहुल गांधी, किंवा प्रदेशाध्यक्ष आम्हाला केव्हा ही भेटले नाहीत. किंवा साधी चौकशी देखील केली नाही. राणे साहेबांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता. असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube