Download App

News Arena India Survey : यशोमती ठाकूरांचा किल्ला मजबूत तर रवी राणांची जागा भाजपला

News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गटात विभागलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दाखवले आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील, तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्व्हेत वर्तवला आहे.

या सर्व्हेत विभागनिहाय आणि जिल्हानिहाय अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील 62 जागापैकी भाजपला 30-31 जागा, तर काँग्रेसला 20-21 जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीला 2 जागा, शिंदे गटाला 5 जागा तर ठाकरे गट खातेही उघडत नसल्याचे दाखवले आहे. इतर 4 जागा मिळवतील असा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात भाजपाला 2, काँग्रेसला 4 तर इतर 2 जागा मिळतील असा अंदाज आहे. सर्व्हेत तिवसामधून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघ सुरक्षित असल्याचे दाखवले आहे तर बडनेरामधून अपक्ष आमदार रवी राणा यांची जागा भाजपला दाखवली आहे. त्यामुळे रवी राणांच्या जागेला धोका आहे का? अशी चर्चा आहे.

तिवसा – मतदारसंघ
तिवसा मतदार संघ हा एकेकाळी कम्युनिस्टांचा गड म्हणून ओळखला जायचा. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटनंतर सर्वात मोठा मतदारसंघ आहे. 2009 पासून यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत देखील ठाकूर यांनी आपला गड राखला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची मंत्री म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे. स्व. प्रभा राव यांच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसला ठाकूर यांच्या रुपाने प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. मधल्या काळात महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षाच्या रेसमध्ये त्यांचे नाव होते. न्यूज एरिना इंडिया संस्थेच्या सर्व्हेत आगामी विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचा किल्ला मजबूत असल्याचे सांगितले आहे.

News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का

बडनेरा – मतदारसंघ
बडनेरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार रवी राणा यांनी 2019 ला हॅट्ट्रिक मारली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ असलेले राणा दांपत्याने त्यानंतर भूमिका बदलत भाजपच्या जवळ जाणे पसंत केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात रवी राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसा पठण करण्यावरुन घेरले होते. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर रवी राणा मंत्रीपदासाठी इच्छूक होते. ‘न्यूज एरिना इंडिया’च्या सर्व्हेत बडनेराची जागा भाजपला दाखवली आहे. त्यामुळे आमदार रवी राणा भाजपमध्ये डेरेदाखल होतात की अपक्ष निवडणुक लढवतात हे पाहावे लागणार आहे.

Tags

follow us