Mumbai : भाजप ( BJP ) आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) व समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची विधानभवन परिसरात लव्हजिहाद मुद्द्यावरुन जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदू समाजाकडून धर्मांतर विरोधी कायदा व लव्हजिहाद विरोधात कायदा आणावा यासाठी भव्य मोर्चे निघाले आहेत. त्यावरुन आता विधानसभेतही चर्चा होत आहे.
तीन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत बोलताना राज्यामध्ये 1 लाख लव्हजिहादची प्रकरणे आहेत, असे भाष्य केले होते. यावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाड, अबू आझमी हे आक्रमक झाले होते. त्यांना भाजप आमदार आशिष शेलार, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तितकेच जोरदार उत्तर दिले होते.
भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा..
आज पुन्हा नितेश राणे व अबू आझमी यांच्यात लव्हजिहाद या मुद्द्यावरुन वाद झाला आहे. यावेळी दोघांची विधानभवनाच्या परिसरातच जुंपली होती. त्यांच्या लोकांमध्ये सत्य ऐकायची ताकदच नाही आहे. फक्त 4 लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते असे बोलत आहेत, असे राणे म्हणाले आहेत. त्यांच्या अशा वागणुकीमुळे आमच्या मुलींची आयुष्ये बरबाद होते आहेत. त्यांना माहित आहे की मी खरी माहिती देत आहे. आज नाही तर उद्या ते एक्सपोज होणार आहेत, अशी टीका राणेंनी अबू आझमींवर केली आहे.
Budget Session 2023 : जुन्या पेन्शनवरुन विधानपरिषदेत विरोधकांचा सभात्याग
दरम्यान, सध्या राज्यात लव्हजिहाद विरोधी व धर्मांतर कायद्याविरोधी कायदा करण्यात यावा यासाठी जोरदार मागणी होत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले आहेत. त्यामुळे याविषयावरुन राज्यात चांगलेच वातावरण तापल्याचे दिसते आहे.