मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये जो धर्मांतरानचा विषय, लव जिहादचा (Love Jihad) विषय, तो खूप काळापासून गाजत आहे, विधिमंडळच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल तो विषय सध्या गाजत आहे. आमच्या महारष्ट्रामध्ये धर्मांतर होतच नाही. लव जिहाद होतच नाही, आणि हिंदू समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल हिंदुत्ववादी संघटना (Hindutva organization) गैरसमज पसरवत आहेत. असे काही नेते मंडळी चुकीची जी माहिती देत आहेत, ती सर्व माहिती खोदून काढण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावेळी सांगितलं.
मी काही जास्त माहिती देण्याअगोदर मी जसा काही दिवसाअगोदर सांगितलं, काही महत्वाचे पुरावे आपल्या समोर ठेवणार आहे, धर्मांतर नेमकं होत कस ? आणि धर्मानंतर झाल्यानंतर त्या कुटूंबियामध्ये काय भावना असते, काही पुरावे आम्ही महाराष्ट्रासमोर दाखवणार आहोत. काही दुसरे विषय मांडण्याअगोदर दौडमध्ये कुमार कुरेशी नावाचा व्यक्ती एका आपल्या हिंदू तरुणाचा त्यांनी सुन्ता केला. १४ ऑक्टोबर २०२२ ला आणि त्यानंतर त्यांनी धर्मांतर त्यांनी केला.
यावरून आरोप काय होतो, धर्मातर होत नाही. पण इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर मुस्लिम समाजाच्या महिला काय बोलतात हे आपण सर्वजणांनी ऐकलं पाहिजे, याठिकाणी कुमार कुरेशेचीच बायको सांगत आहे की, ते मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत, आणि ती किती भीतीच्या वातावरणात आहेत, हे तुम्ही स्वतः देखील ऐकलं असेल, ज्या तरुणांचा त्यांनी सुन्ता त्यांनी केला. धर्मांतर केलं, या घटनेनंतर त्याच कुटूंब दौड शहर सोडून घाबरून निघालं आहे.
मूळ मुद्दा असा आहे, आता जे अबु आजमी बोलत आहेत. तो मुंब्र्याचा जितोउद्दीन जे बोलत आहे, हे त्यांनी या गोष्टी ऐकल्या पाहिजेत ना, आम्ही जे बोलत आहे सातत्याने त्या मुलीला त्या तरुणाशी लग्न करायचं असेल, त्याच्या बरोबर संसार करायचं असेल, तर तुम्हाला त्याच धर्म बदलण्याची काय गरज आहे. तुम्ही त्याला हिंदू ठेवा ना, कुठल्या मुस्लिम तरुणाला हिंदू तरुणीशी लग्न करायचं असेल, तुझं जे खरं प्रेम असेल तर धर्म बदलण्याची काय गरज आहे. असा संतप्त सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थितीत केला. लव जिहादच्या (love jihad) विषयावरून वातावरण चांगलंच तापत आहे.यावरून नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. तसंच विधीमंडळ अधिवेशनात धर्मांतर बंदीचा कायदाही सरकार आणणार असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली आहे.