ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे…; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Nitesh Rane on Aditya Thackeray : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakh) देशात आणण्यासाठी आज ब्रिटनला जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येतील. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ब्रिटिश म्युझियममधील वाघनखे हे शिवरायांचे आहेत का? असा सवाल आमदार […]

Nitesh Rane : 'हा' कॉंग्रेस नेता भाजपवासी होणार? तुमचा-आमचा बॉस लवकरच एकच; राणेंचं सूचक वक्तव्य

nitesh rane

Nitesh Rane on Aditya Thackeray : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakh) देशात आणण्यासाठी आज ब्रिटनला जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येतील. दरम्यान, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ब्रिटिश म्युझियममधील वाघनखे हे शिवरायांचे आहेत का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला होता. त्याला आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Mahatma Gandh : इंडिया आघाडीच्या ‘मी पण गांधी’चं टीझर लाँच!, उद्या पदयात्रेचं आयोजन 

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच नाव न घेता फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात लिहिलं की, ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे वापरावी लागतात. त्याच्या पोरकट पोराकडून दुसरी काही अपेक्षाच नाही, पेहेचना कौन? असा सवाल राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं महाराष्ट्रात येत आहेत. ही वाघनखं १६ नोव्हेंबरला मुंबईत आणले जाणार आहे. वाघनखं येण्याआधीच राज्यातील नेते एकमेकांवर शाब्दिक नखांना एकमेकांना ओरबडत असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या वाघनखावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला काही प्रश्न केले होते.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की, फक्त शिवकालीन आहेत? याचा खुलासा राज्य सरकारने करावा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केलं. तसेच ही वाघनखं किती वर्षांसाठी महाराष्ट्रात आणले जात आहेत? यासंदर्भातही राज्य सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्याला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदारर प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंनी केलेल्या या टीकेवर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version