Download App

Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी

Nitesh Rane on Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहून सुचवली होती. असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खआसदार निलेश राणे हे दोघेही उपस्थिर होते. नितेश राणे म्हणाले, की आम्ही सर्वजण या रिफानरीच समर्थन करण्यासाठी उतरलो आहोत. मात्र आज याच रिफायनरीला विरोध करण्यासाठी मुंबईवरून एक पर्यटक आल्याची टीका यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आज सर्वात मोठा दलाल रत्नागिरीमध्ये आला आहे.

Udhav Thackeray बारसूमध्ये दाखल, ग्रामस्थांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेणार

जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र आले होते तेथे राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले ते मोदींच्या मन की बातवर टीका करतात पण त्यांना मन की बात समजते की धन की बात समजते ते त्यांनी सांगाव. सत्तेत असताना त्यांनी ही रिफानरी बारसूमध्ये व्हावी असं समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवलं होत. त्यांचा हा विचार कोकणातील जनतेसाठी नाही तर मातोश्रीवर खोके पोहचले पाहिजे यासाठी बदलला आहे.

त्यामुळे सगळा पैसा काय आदित्य आणि तेजसने कमवायचा का? कोकणातील तरूणांनी नाही का? असा सवाल यावेळी राणे यांनी केला आहे.

या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी, वैभव नाईक, विनायक राऊत हे नेते आहेत. यांच्यासह उद्धव ठाकरे हे ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. गेल्या आठवड्यात याच ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना बारसू येथे येण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे हे बारसूच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले आहेत.

Tags

follow us