Udhav Thackeray बारसूमध्ये दाखल, ग्रामस्थांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेणार
Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहून सुचवली होती. असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी, वैभव नाईक, विनायक राऊत हे नेते आहेत. यांच्यासह उद्धव ठाकरे हे ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. गेल्या आठवड्यात याच ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना बारसू येथे येण्याता शब्द दिला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे हे बारसूच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले आहेत.
Raj Thackery आज रत्नागिरीत, सूडभावना, खोके, गद्दारी अन् राजीनामा राज यांच्या निशाण्यावर कोण?
यामध्ये ते अगोदर सोलगाव ग्रामस्थांना भेटणार आहेत. त्यांनंतर ते कातशशिल्प येथे पाहणी करणार आहेत. तर गिरमा देवी चौकार ते पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 12.30 वाजता ही पत्रकार परिषद ते घेणार आहेत. दरम्यान दुसरीकडे आजच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कोकणात जाहीर सभा आहे.