Nitesh Rane On Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आणखी एक मोठा धक्का दिलाय. आमदार सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असून, ते विधानपरिषदेचे उपसभापतीपदाचे उमेदवार आहेत. ठाकरे यांना सोडून अनेक जण जात आहेत. त्यावर बोलताना भाजपचे मंत्री नितेश राणे (
Nitesh Rane) यांनी मर्यादा ओलांडली आहे. लोक सोडून जात आहेत, हे उद्धव ठाकरे यांच पाप आहे. 2019 ला राजकीय धर्मांतरण केले. मौला, मौलवींसोबत झोxxxले. तेव्हा शेण, माती खाल्ली नसती तर हे दिवस आले नसते, अशी भाषणा राणे यांनी वापरले आहेत.
आता काय राहिले आहे. बोलण्यासाठी काय राहणार आहे. शेवटी उद्धव ठाकरे यांचे पाप आहे. 2019 ला राजकीय धर्मांतरण केले नसते तर आता अशी लायकी राहिले नसती. सचिन अहिर हा छोटा माणूस नाही. वारंवार बोलतोय ठाकरे गटात महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी आहे. त्यांच्यामुळे उबाठा पूर्ण खाली होणार आहे. टीएमसी खाली झाली तशी. आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावे. हिमतीने निवडून आणून दाखवावे. सचिन आहिर, सुनील शिंदे यांच्यामुळे सभागृहात बसतात आणि टोमणे मारतात. आता बिचाराचे दिवस अवघड आहे, असा टोमणाही राणे यांनी यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणानंतर लोहगड देशभरात चर्चेत; ‘तो’ स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
सहा खासदार फुटल्यानंतर आमदार फुटला आहे. आता एक वरळीमध्ये सभा घ्यावी. मुळामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व त्यांची घरातील लोकांचा स्वभाव याला कारणीभूत आहे. त्यामुळे पडझड होत आहे. ते बाळासाहेबांचे, मातोश्रींचे झाले नाहीत. ते खासदार, आमदारांचा कसे होणार. आता म्हणतात देवेंद्र हे पंतप्रधान व्हावे म्हणून. 2019 ला तू माती, शेण खाल्ले आहे. फडणवीस यांनी 2014 ते 2019 तुला भावासारखे सांभाळले. त्यांना तू मुख्यमंत्री होऊ दिले नाही. हा निच माणूस आहे. निचचे दुसरे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहे. 2019 माती खाल्ली नसती. मुल्ला, मौलवींबरोबर झोxxला नसता. आता पाप भोग. हिंदुत्वाच्याविरोधात, धर्माच्या विरोधात, देवता विरोधात गेल्यानंतर इतके वाईट होणारची अशी टीका मंत्री राणे यांनी केली.
Chembur Accident : मुंबईत मोठी दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी गंभीर जखमी
एक लक्षात घ्या, गणेश नाईक, राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे पक्षाबाहेर उद्धव ठाकरेंचा विरोधात जात आहे. आता लाईन लागली आहे. तोच घाण आहे. वेगवेगळी कारणे आहेत. सगळे एका माणसांच्या विरोधात बाहेर जातात. त्याच माणसांत फॉल्ट आहे. गपचूप घरी बसावे किंवा वृद्धाश्रमात जावे. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात यांनी छळले आहे. त्याचे भोग भोगत आहेत. राणेसाहेबांना जेवणाच्या ताटावर उठविले हे तो भोगणार आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.
मुळामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजकारण सोडावे. आता तसे लग्नसमारंभ खूप होतात. आम्हा लोकांना कॅमेरामन लागतात. करावे हे चांगली गोष्ट आहे. लग्नाची ऑर्डर दोन-तीन आणू देतो, असा टोमणे ही राणे यांनी मारलाय.
