Siya Goyal : केतन अग्रवाल प्रकरणानंतर लोहगड देशभरात चर्चेत; ‘तो’ स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Siya Goyal : व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा आणि धक्कादायक खुलासा करत केतनची होणारी पत्नी सिया गोयल

Siya Goyal

Siya Goyal : व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा आणि धक्कादायक खुलासा करत केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. सिया आणि चेतनला अटक झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणात सखोल तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनवर लोहगडच्या किल्ल्यावर केतनची हत्या करण्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे केतन अग्रवाल हत्या प्रकरण आणि या प्रकरणात होणाऱ्या धक्कादायक खुलास्यानंतर सोशल मीडियावर लोहगड किल्ला चर्चेचा विषय बनला आहे. या हत्याकांडानंतर लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या वाढली असल्याची माहिती समोर येत आहे.

पर्यटकांची संख्या वाढली

लोहगड किल्ल्याच्या (Lohagad Fort) कोणत्या स्पॉटवर केतनची हत्या झाली? सिया (Siya Goyal) आणि चेतनने (Chetan Chaudhary) केतनला (Ketan Agarwal) दरीत कसं ढकलले? हे पाहण्यासाठी लोक देशभरातून लोहगड किल्ल्यावर येत आहे. सुट्टीच्या दिवशी लोहगड किल्ल्यावर हजारभर पर्यटक येत होते मात्र आता ही संख्या पंधराशेवर पोहचली असल्याची माहिती आहे. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान किल्ल्यावर चारशे पर्यटक येत होते मात्र ही संख्या आता वाढली असून सहाशे पर्यटकांपर्यंत पोहचली असल्याची माहिती लोहगडवरील स्थानिक विक्रेत्याने दिली.

3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

तर दुसरीकडे सिया आणि चेतनने हा गुन्हा कसा केला याचा तपास सध्या पोलिसांकडून (Pune Rural Police) करण्यात येत असल्याने सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 29 जून रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालायने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे.

मुंबईत मोठी दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी गंभीर जखमी

नेमकं प्रकरण काय?

सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचं पुढील महिन्यात लग्र होणार होतं मात्र सियाचे चेतनसोबत प्रेमप्रकरण असल्याे तिला लग्न करायचे नव्हते. त्यामुळे केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतनने हत्येचा कट रचला होता आणि 18 जून रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास केतनला लोहगडच्या किल्ल्यावरुन 350 खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

follow us