लोहगडावर ‘केतन’च्या हत्येचं नाट्यरुपांतर; ‘त्या’ दिवशी 75 मिनिटांत नेमकं काय घडलं?
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी सिया गोयलला लोहगडावर नेत संपूर्ण घटनेचं नाट्य रुपांतर केलंय.
Ketan Agrawal : पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी सिया गोयलला थेट लोहगडावर नेत केतनच्या हत्येचं नाट्य रुपांतर केलं. या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची आज पोलिस कोठडी संपणार असून त्यांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याआधीच पोलिसांनी काल आरोपीला लोहगडावर नेत मानवी आकाराच्या पुतळ्याच्या सहाय्याने फॉरेन्सिक टीमच्यासमोर स्क्रिन रिक्रिएशन केलं.
आनंदाची बातमी ! रायगडावर आता अत्याधुनिक रोपवे; शिवभक्तांना 50 ते 100 रुपयांत गडावर जाण्याची सुविधा
घटनेच्या दिवशी सिया आणि केतन सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगडावर पोहोचले होते. हत्येच्या दिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9.20 वाजता केतनने कार आणि चेतनने दुचाकी कुठे पार्क केली? याबाबत पोलिसांकडून विचारणार करण्यात आलीयं. तसेच तिकीट काढताना हावभावातून एकमेकांना काय सांगितलं सीसीटीव्हीच्या प्रसंगात कय घडलं? पुढील 15.20 मिनिटे कुठं कुठं ट्रेक केलं चेतनने कसा पाठलाग केला? त्यानंतर केतन अग्रवालला दोघांनीही दरीत कसं ढकललं? याचं नाट्यरुपांतर करण्यास सांगितलं. तब्बल तीन तासांनंतर हे संपूर्ण नाट्यरुपांतर संपलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि साहिल गोयल यांची मैत्री क्रिकेटच्या मैदानावर झाली होती. दोघांनी अनेक क्रिकेट सामने एकत्र खेळले होते. सिया गोयल देखील साहिलसोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात असे. याच माध्यमातून सिया आणि चेतन यांची ओळख झाली. दिवाळी 2025 मधील एका पार्टीत दोघांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील संपर्क अधिक वाढत गेला.
Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांना येलो – ऑरेंज अलर्ट
तसेच मागील सहा महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 फोन कॉल्स झाले असून त्यांनी एकूण 238 तासांपेक्षा अधिक संवाद साधला. या कॉल रेकॉर्ड्समुळे दोघांमधील घनिष्ठ संपर्क स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लोणावळा विभागाचे पोलीस उपाधीक्षक गजानन टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींची भूमिका आता अधिक स्पष्ट होत आहे. याशिवाय सियाचा भाऊ साहिल आणि तिच्या इतर नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.