Nitin Deshmukh On Chandrashekhar Bawankule : भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरू झाली आहे. या संभेला संबोधित करतांना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मतिमंद असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकेरंनी गृहमंत्री यांच्यावर टीका करतांना फडतूस गृहमंत्री लाभला आहे, अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्तुत्तर देतांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. यापुढं फडणवीसांबाबक काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असं बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळेंच्या याच वक्तव्याचा नितीन देशमुख यांनी जोरदार समाचार घेतला आहे. देशमुख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर येऊ देणार नाही, असं बावनकुळे म्हटले होते. मात्र, आज उध्दव ठाकरे हे नागपुरात आले. मला तर समजत नाही की, भाजपने मतिमंद प्रदेशाध्यक्ष का केला असेल. हे त्यांनी मुद्दाम केलंय, असं वाटतं. माझं तर या मंतिमंद प्रदेशाध्यांक्षांना आव्हान आहे की, उद्धव ठाकरेंना सोडा, साध्या शिवसैनिकालाही तुम्ही अडवून दाखवा. मग मी समजेल की, हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष मतिमंद नाही, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे.
Jitendra Awhad ; एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीची अंत्ययात्रा काढली
ते म्हणाले, सध्याचं सरकार हे ईडीच्या भरोवशावर आलं. हे सरकार कसं आलं, कसं बसलं हे मला सर्वांत जास्त मला माहित आहे. ईडीमुळ फक्त सरकारच आलं नाही, ईडीमुळं महाराष्ट्रच बदनाम झालं नाही. तर या ईडीमुळं आशियाखंडात सर्वात जास्त गद्दार जर कुणाला म्हणत असतील, तर ह्या शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणतात. ईडीने महाराष्ट्राला कलंक लागला आणि तो कलंक भाजपमुळं लागल्याची टीका त्यांनी केला.
हे गद्दार 40 आमदार आता सांगतात की, पंतप्रधान मोदींचा फोटो लावून आम्ही निवडणूक आलो. 2014 ची विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढली होती. 2014 ला सेनेचे 63 आमदार होते. त्यावेळेस मोदींचा फोटो एकाही शिवसेनेला लावला नव्हता. 2019 ला भाजप-सेनेची युती होती. त्यावेळी आम्ही मोदींचा फोटो लावला होता. पण, तेव्हा आमचे आमदार कमी झाले. आमचे फक्त 56 आमदार निवडून आले. पंतप्रधान मोदींचा फोटो लावला म्हणून शिवसेनेचे आमदार वाढले नाही, उलट कमी झाले असा टोला आमदार देशमुख यांनी लगावला.
2014 ला फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला आनंद झाला होता की, विदर्भाचा विकास होईल. विदर्भाचा सिंचन होईल. तेव्हा अर्थमंत्रीही विदर्भाचे होते. पण, 2014 पासून विदर्भाचा विकास झाला नाही, असं ते म्हणाले.
देशमुख म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आमच्या विदर्भातील आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी आमच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला साडेतीनशे कोटीचा रुपयांचा निधी दिला होता. मात्र, आत्ताचे पालकमंत्री असलेले फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात दिडशे कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्यावर पिण्याच्या पाण्याला स्थगिती दिली. आमचा पट्टा खारपान पट्टा आहे. दोन हजार टीडीएसचं पाणी आमच्या भागातली महिला पिते. त्या आईला ठाऊक असतं या पाण्यामुळं माझी, माझ्या नवऱ्याच्या किडण्या गेल्या. तरी ती आई ते पाणी आपल्या लेकरांना पाजते. 3 महिन्यांच्या बाळाला देखील तेच पाणी प्यावं लागतं. तेव्हा त्यांना काय वेदना होत असतीत, असा सवाल देशमुख यांनी केला.
दरम्यान, आता हेच पाणी घेऊन फडणवीसांच्या घरी घेऊन जाणार आहे, आणि त्यांना प्यायला देणार आहे. त्यासाठी आम्ही पदयात्रा काढली आहे. 21 एप्रिलला आम्ही हे पाणी घेऊन फडणवीसांच्या घरी पोहोचणार आहोत, असं देशमुखांनी सांगितलं.