Download App

Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान

Image Credit: letsupp

Nitin Gadkari News : देशभरात आता आगामी निवडणुकांकडेच सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात मोठं विधान केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी आणि चहापाणी करणार नाही, मत द्यायचं तर द्या नाहीतर नका देऊ, असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केलं आहे. वाशिम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी हे विधान केलं आहे.

Sanjay Raut : इथे लोकशाहीची हत्या अन् ‘घाना’ मध्ये लोकशाहीवर प्रवचन; राऊतांचा नार्वेकरांचा टोला

पुढे बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत मी पोस्टर, बॅनरबाजी आणि चहापाणी करणार नाही, तुम्हाला मत द्यायचं तर द्या नाहीतर नका देऊ मात्र, लोकांची सेवा मी प्रमाणिकपणे करणार असल्याचंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख

तसेच आगामी निवडणुकीत तुम्हाला मालपाणी मिळणार नाही हे लक्षात ठेवा, तुम्हाला लक्ष्मीदर्शन आणि देशी विदेशीही मिळणार नाही. मी पैसा खाणार नाही आणि तुम्हालाही खाऊ देणार नाही, पण तुमची सेवा मात्र इमानदारीने करणार असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Pankaja Munde : जर निवडणुकीत तिकीट दिलं नाही तर.. पंकजा मुंडेंचा भाजपला रोखठोक इशारा

एकेकाळी विदर्भाचा विकास झालेला नव्हता, त्यावेळी तशी परिस्थितीही नव्हती. आम्ही विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले आहेत. यापुढेही सर्वपक्षांनी हे प्रयत्न सुरुच ठेवले पाहिजेत, त्यामुळे आपण आणखीन पुढे जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Sonu Nigam कडून बिटर बिट्रेयल्सची घोषणा ‘अच्छा सिला दिया’ च्या आठवणींना उजाळा

आपण हल्ली कुणालाही फुकट मदत करत नाही, लोकांना वाटतं याच्याकडे हरामाचा पैसा आहे पण असं नाही तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला निवडणुकीत पोस्टर आणि बॅनरबाजी चहापाणीही करण्याची गरज नसल्याचं विधान गडकरींनी केलं आहे.

गडकरींनी नागपूरचा ‘तो’ किस्साही सांगितला…
आमदार नसताना मित्रांसोबत पीव्हीसी पाईचं मशीन आणण्यासाठी गेलो होे. तेव्हा आम्हाला विचारलं की तुम्ही नागपूरहुन म्हणजे विदर्भातून आलात का? आम्ही हो म्हटलं, त्यावेळी व्यापारी म्हणाले विदर्भाचा विकास झाला आहे का? त्यावर मी म्हटलं होत नाहीये, त्यावर ते म्हणाले नागपूरमध्ये लोकसंख्या किती? मी सांगितलं होतं की 22 लाख त्यानंतर उद्योग व्यवसायाबद्दल मला विचारणा करण्यात आली होती. त्यावर मी म्हणालो, मला संपूर्ण विदर्भाबद्दलची लोकसंख्या विचारण्यात आल्यानंतर मी सांगितलं 5 कोटी असेल, तिथेही उद्योग व्यवसाय नसल्याचं मी सांगितलं. मग त्यांनी विचारलं की तिकडचे लोकं काय करतात. त्यावर मी सांगितलं, गावांगावांमध्ये पान ठेले आहेत, तिथे ते लोक पानावर कथ्था चुना लावतात आणि बाकीचे लोक पान खातात. मी हे गंमतीने म्हटलं होतं पण दुर्दैवाने ते खरं होतं. मात्र आज विदर्भात ती स्थिती नाही. विदर्भाचं नाव जगात कशामुळे पोहचलं? असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज