Download App

राजकारणातील आदर्श कोण? गडकरींनी घेतलं ‘या’ कम्युनिष्ट नेत्याचे नाव

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari : मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, तेव्हा दिल्लीला कम्युनिष्ट पार्टीच्या (Communist Party) कार्यालयात गेलो आणि ए. बी. बर्धन यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. ए. बी. बर्धन (A. B. Bardhan) हे राजकारणातले एक प्रामाणिक आणि विद्वान नेते होते. बर्धन यांच्यासारखेच जॉर्ज फर्नांडिसही माझे राजकारणातील आदर्श होते, असं विधान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. (Nitin Gadkari said A B Bardhan and George Fernandes My idol in politics)

नितीन गडकरी आज माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले, पुरंदरची भूमी एतिहासिक भूमी आहे. उमाजी राजेपासून प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत अनेक लोकांनी आपलं योगदान देऊन या भूमिचाच नव्हे तर राज्याचा लौकीक वाढवला. दादासाहेब जाधवराव यांचा व्यक्तीमत्व तसंच आहे. ज्या जनेतनं निवडून दिल, त्या जनेतीश प्रामाणिक राहून ते काम करत राहिले. कधी सभागृहात त्यांचा तोल गेला नाही. संस्कृत नेता म्हणून त्यांचा लौकीक आहे. राजकारण हा पैसा कमावण्याचा धंदा नाही, हे समजून त्यांनी लोकांची सेवा केली. प्रतिकुल परिस्थितीत ते जिंकत राहिले. कारण,जनतेचं त्यांच्यावर विश्वास होता, असं गडकरी यांनी सांगितलं.

Prajakta Mali: ‘जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूत’; प्राजक्ताची समीर चौघुलेसाठी खास पोस्ट 

आज ज्या पार्टीचं सरकार येईल,त्या पक्षाचं झेडा कार्यकर्ते घेत असतात. पण, काही कार्यकर्ते विचारांशी कधी तडजोड करत नाही. देशात मतभिन्नतेचा प्रश्न नाही, मतशुन्यतेचा खरा प्रश्न आहे. यावेळी बोलतांना त्यांनी एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, तेव्हा दिल्लीला कम्युनिष्ट पार्टीच्या कार्यालयात गेलो आणि ए. बी. बर्धन यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. मला त्यावेळी अनेकांनी सांगितलं की, तुमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे, कम्युनिष्ट पार्टीचे चार-दोन खासदार आहेत, तुम्ही कशाला जाता त्यांच्या कार्यालयात? पण, मी कुणाचं काही ऐकलं नाही, आणि कम्युनिष्ट पार्टाच्या कार्यालयात जाऊन ए. बी. बर्धन यांच्या पाया पडलो. माझा पक्ष, विचारधारा बर्धन यांच्या विचारांपेक्षा, पक्षापेक्षा वेगळी होती. पण, ए बी बर्धन हे हे राजकारणातले एक प्रामाणिक आणि विद्वान नेते होते. बर्धन आणि जॉर्ज फर्नांडिसही माझे आदर्श होते. मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहिला. ते त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले, असं गडकरी यांनी सांगितलं.

गडकरी म्हणाले, प्रवाहाविरुध्द उभं राहणं हे आव्हान होतं. जनता पार्टी कमी होत चालली होती. या पार्टीला भविष्य नाही, असं वाटत होतं. पण, दादासाहेब जाधवरावांनी आपली विचारधारा आणि पक्ष बदलला नाही. पक्षानं नाव बदललं, चिन्ह बदललं, पण, दादासाहेब एकनिष्ठ राहिले, असं सांगत सध्या स्थितीवरही गडकरींनी भाष्य केलं. ते म्हणाले, आज दादांच्या जागी कोणी असता, तर त्यानं काय केलं असतं. तर आज त्याच्या शिक्षणसंस्था, साखर कारखाने असते. पण, राजकारण हे समाजसेवेसाठी आहे. राजकारण म्हणजे, सत्ताकारण, लोकनीती, समाजनीती असते, असं गडकरी यांनी सांगितलं.

Tags

follow us