Download App

बाहेरच्या राज्यातील कोणी आमच्या इथं नाक खुपसू नये, विखेंचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना टोला

अमरावती : तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief Minister of Telangana) तसेच बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांची नुकतीच राज्यातील नांदेड येथ एक सभा पार पडली. यावेळी त्यांनी सभेत बोलताना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आव्हान दिले होते. शेतकऱ्यांसाठी तेलंगणात असलेल्या योजना राबवून दाखवा तर महाराष्ट्रात येणार नाही असे के. चंद्रशेखर राव म्हणाले होते. यावर भाजपनेते तसेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. बाहेरच्या राज्यातील कोणी आमच्या इथं नाक खुपसू नये असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आता महाराष्ट्रात देखील आपल्या पक्षाचा प्रचार करत असून आपल्या पक्षाची मूळं राज्यात रुजवू लागले आहे. नुकतीच त्यांनी राज्यातील नांदेड येथे एक जाहीर सभा देखील घेतली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांना चॅलेंज केलं. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना तुम्ही राबवून दाखवा तर मी महाराष्ट्रात येणार नाही असं राव म्हणाले होते.

नाना पटोलेंनी ठाकरेंचा इशारा धुडकावला…. आम्ही सावरकरांच्या विचारांना मानणार नाही…

राव यांनी दिलेल्या आव्हानाला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले आहे. काही प्रादेशिक पक्ष राज्यात नाक खुपसत आहे मात्र राज्यातील जनता हे काही स्वीकारणार नाही. तसेच राज्यात भाजपा व शिवसेनेचे सरकार हे सक्षम आहे. हे जनतेच्या मनातलं सरकार आहे, म्हणूनच बाहेरच्या राज्यातील कोणी आमच्या इथं नाक खुपसू नये. यामध्ये त्यांना यश मिळणार नाही अशा शब्दात मंत्री विखे यांनी अप्रत्यक्षरित्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना टोला लगावला आहे.

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

तसेच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याचा देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला. विखे म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हेच प्रमुख पक्ष असल्याचं म्हणतात तर, भुजबळ यांनी स्वप्न रंजन करण्याच सोडून दिले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी भुजबळ यांना सुनावले आहे.

Tags

follow us