सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

पुणे : गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यासह देशातील कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती देखील उद्भवली होती. यातच कोरोना लसीकरणानंतर बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता राज्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजी लागली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले असल्याची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यातच पुणे व अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोनाचे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

देशात गेली दोन वर्षे कोरोनाने कहर केला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण बाधित झाले होते. विशेष म्हणजे लोकसंख्या जास्त असलेल्या आपल्या देशात कोरोनाची रुग्णसंख्या देखील झपाट्याने पसरत होती. यामुळे आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच कोरोना व्हॅक्सिन बाजारात आल्यानंतर कोरोनाचा वेग मंदावला होता. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन देशातील निर्बंध हटवण्यात आले होते.

मात्र आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना सक्रिय रुग्णांची आकडेवारी समोर येत आहे. यातच अहमदनगर व पुणे जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची टक्केवारी दहाच्या जवळपास पोहचू लागली आहे. यामुळे या ठिकाणी प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का?

या जिल्ह्यात कोरोना वेगाने फैलावतोय
राज्यात सर्वाधिक बधितांचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबारमध्ये कोराेना चाचण्यांपैकी बधितांचे प्रमाण 20 टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. नंदुरबार पाठोपाठ राज्यातील पुणे ९.२ टक्के, औरंगाबाद ९ टक्के, कोल्हापूर ८.७ टक्के, नगर ८.४ टक्के, सांगली ७.८ टक्के आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube