ठाकरे बंधूंची युती होताच, शरद पवारांचा मोठा निर्णय थेट ठाकरे गटाशी चर्चाच थांबवली
Sharad Pawar On BMC Election : आज राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिका
Sharad Pawar On BMC Election : आज राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकासाठी ठाकरे बंधूंची युती होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत शिवसेना ठाकरे गटासोबच युतीसाठी सुरु असणारी चर्चा थांबवली असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) गटाने मागणी केलेल्या जागांवर अपेक्षित प्रतिक्रिया आली नसल्याने शरद पवारांनी मोठा निर्णय घेत ठाकरे गटाशी चर्चा थांबवली आहे. तर आता काँग्रेससोबत युतीसाठी शरद पवार गट प्रयत्न करणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (NCPSP) 10 पेक्षा जास्त जागा द्याला तयार नसल्याची माहिती आहे. मात्र जिथं घटक पक्षाला आदर दिला जात नाही तिथ युती करणे योग्य नाही. त्यामुळे आपण आपला वेगळा निर्णय घ्यावा असा मतप्रवाह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेससोबत शरद पवार गटाची 58 जागांबाबत बोलणी सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंत काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहिली जाणार आहे आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ठाकरेंसोबत चर्चा थांबवली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गट ठाकरे गटासोबत युती करण्यास उत्सुक होती. माहितीनुसार, ठाकरे गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 50 जागांची मागणी केली होती मात्र ठाकरे गट शरद पवार गटाला 10 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. त्यामुळेच शरद पवार गटाने आता ठाकरे गटासोबत युतीची चर्चा थांबवली आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अभिनेता गोविंदासह ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या प्रस्तावर काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
