Not when Ajitdada is in trouble but for Tatkare.., news from Rohit Pawar on Shelke’s statement : सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील सुनील शेळके आणि रोहित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात रोहित पवारांनी शेळकेंवर भाजपमध्ये जाण्याचे आरोप केल्यानंतर शेळकेंनी रोहित रोहित पवार हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करत सुनील शेळके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. रोहित पवार यांनी अलीकडेच राहुल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली असून, त्यानंतरच शेळकेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा शेळकेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी सुनील शेळके यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देत, त्यांच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा शेळके यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चांवर रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत, अशा वक्तव्यांना कोणतेही महत्त्व देत नसल्याचे सांगितले.
सरकारला किंमत मोजावी लागणार; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, फडणवीसांवर गंभीर आरोप
रोहित पवार म्हणाले की, “हे काही राजकीय विश्लेषण नाही, तर भविष्यवाणीप्रमाणे बोलत आहेत.” कोणत्याही ठोस आधाराशिवाय केलेली अशी विधाने केवळ चर्चेत राहण्यासाठी केली जातात, असा टोला त्यांनी लगावला. राजकारणात काम आणि जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात; अफवा पसरवून किंवा भविष्य सांगून भूमिका स्पष्ट होत नाही, असेही त्यांनी म्हटले.
नाशिकचे आयजी बदलले, कृ्ष्ण प्रकाश, लखमी गौतम, मनोज शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
त्यांनी पुढे अधिक कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारेच अशी वक्तव्ये करतात.” कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाची भेट झाली, यावर अंदाज बांधून राजकारण करण्याची काही नेत्यांची सवय झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वतःच्या राजकीय भूमिकेबाबत आपण स्पष्ट आहोत आणि अशा अफवांमुळे आपल्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
या वादात त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाचाही मुद्दा उपस्थित केला. “अजित पवार अडचणीत असताना हे लोक बोलत नव्हते, आता सुनील तटकरे अडचणीत असताना बोलत आहेत,” असा सवाल करत त्यांनी काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षातील काही व्यक्तींना विशिष्ट वेळीच बोलण्याची आठवण होते, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले होते सुनील शेळके?
रोहित पवार गेल्या 3-4 महिन्यांपासून पक्ष आणि समाजामध्ये कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते शरद पवार पक्षाचे असताना देखील ते शरद पवारांना सोडून काँग्रेसच्या राहुल गांधींचे नेतृत्व मान्य करत आहे. तसेच ते पक्षातील इतर नेत्यांना डावलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात पक्ष पु्र्णपणे रसातळाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
आता ते दुसऱ्यांच्या पक्षामध्ये लक्ष घालून काही अंतर्गत कलह किंवा वाद निर्माण करता येतील का? यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच बारामतीच्या पोट निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी किती नैतिकता दाखवली? फक्त सोशल मिडीया आणि इतर मिडीयासमोर येऊन फक्त प्रसिद्धीसाठी प्रचारासाठी आले. ते फक्त एक तास आले होते. तसेच ते पुर्णपणे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. रोहित पवार हे आता जे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत ते काही दिवसांतच काँग्रेसमध्ये जातील. त्यासाठी त्यांनी स्वत: दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. काँग्रेसच्या नेत्यांच्या देखील ते संपर्कात आहेत. तसेच बारामतीच्या पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा करण्याचा हट्ट देखील रोहित पवारांचाच होता. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
