Download App

कुणबी समाजही काढणार राजकीय पक्ष! ‘या’ दिवशी करणार…

Kunbi Community Political Party : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय पक्ष उतरणार आहे. आता कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यामुळे या पक्षाखाली राज्यात कुणबी समाजाला एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील कुणबी समाजाचा नवीन पक्ष लढवणार आहे. मागील चार ते सहा महिने कुणबी समाजाच्या नेत्यांनी राज्यभर दौरे केले. कुणबी जोडो अभियान राबवले. तसेच रायगड जिल्ह्यात झालेल्या सभेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. येत्या २२ एप्रिल रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सध्या त्याबाबतची जोरदार तयारी कुणबी नेत्यांकडून सुरू आहे.

देसाईंचा लोढावर हल्ला : ही काय बिल्डिंगची स्कीम नाही की ज्याला तुम्ही नद्यांची नावे देताय… – Letsupp

राज्यातील कुणबी समाजातील नेत्यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या संख्येनं आहोत. मात्र, आमच्या लोकप्रतिनिधींची संख्या अपेक्षित अशी नाही. राज्यातील प्रमुख पक्षांनी आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.

या पक्षाचा कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध हा प्रामुख्याने अजेंड्यावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड येथे झालेल्या मेळाव्यामध्ये रिफायनरीविरोधात एल्गार करण्यात आला होता.

Tags

follow us