Download App

मनोज जरांगेंनी छगन भुजबळ नावाची कावीळ, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा…; हाकेंची टीकास्त्र

मनोज जरांगे यांना छगन भुजबळ या नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. - हाके

  • Written By: Last Updated:

Laxman Hake on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी गावात दगडफेक झाल्याची घटना घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याच दगडफेकीवर जरांगेंनी मंत्री छगन भुजब (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

BJP च्या विधानपरिषद उमेदवांराच्या यादीमध्ये ट्विस्ट, ‘ते’ लेटरहेड बनावट; बावनकुळेंची माहिती 

लक्ष्मण हाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना हाकेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जरांगेंनी भुजबळांवर केलेल्या आरोपाविषयी विचारले असता हाके म्हणाले, मनोज जरांगे यांना छगन भुजबळ या नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना सर्वत्र छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे. कावीळ अशीच वाढत गेली की काय होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी डॉक्टरांकडून चांगला सल्ला घ्या. चांगली ट्रिटमेंट घ्यावी, अशी त्यांना विनंती आहे, असं हाके म्हणाले.

नेमकं काय घडलं?

ओबीसी आंदोलक आणि मागासवर्गाय आयोगाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा गुरूवारी बीडमध्ये पोहोचली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा भगवानगडावर होता. मात्र, त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरी येथे डीजेवर दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात तणाव निर्माण झाल्यानं हाकेंनी यात्रा स्थगित केली.

जरांगे काय म्हणाले?
दरम्यान, यावरून जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. जरांगे म्हणाले, छगन भुजबळ यांना दंगली घडवून आणण्याचा नादच लागला आहे. राज्यात शांतता राहू द्यायची नाही असा त्यांचा पहिल्यापासून प्रयत्न आहे. त्यांनीच सांगितलं असेल  गाड्या फोडा, दगड हाणा, मी बरोबर करतो… राज्यात दंगली व्हाव्यात, हे भुजबळांचे स्वप्न आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे त्यांचा धंदा आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष ठेवावे, असेही जरंगे यांनी म्हटले आहे.

follow us