Chhagan Bhujbal On Sharad Pawar : राज्यात आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आल्याने ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील राज्य सरकारने जीआर जारी केल्याने नाराज झाले आहे. राज्य सरकारकडून ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन समित्यांमध्ये समतोल असावा असं म्हटले होते. तर आता आम्ही ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लढायचे नाही का? असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांना विचारला आहे.
पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही आमचा आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? शरद पवार यांचा आदर करतो पण त्यांना माझे सांगणे आहे की, शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो ते मंडल कमिशनासाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केले त्यासाठी तुमचे आभार देखील मानले पण आमच्या आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको का? मंडल आयोग येईपर्यंत सरकार आपल्या पद्धतीने आरक्षण देत होते.
असा सवाल मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांना विचारला आहे. ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का? पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हापासून मराठी समिती अस्तित्वात होती, त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि जयंत पाटील होते. शिवसेनेच्या वतीने शिंदे आणि सुभाष होते आणि काँग्रेसच्या वतीने थोरात आणि अशोक चव्हान होते त्यावेळी आपण बोलला नाहीत.
BCCI चा नवा बॉस कोण? गृहमंत्री अमित शाहंसोबत बैठक; ‘या’ दिवशी होणार घोषणा
मी शरद पवार यांचा आदर करतो परंतु अलीकडे त्यांनी दोन वेळा असे म्हटले आहे की, दोन समित्यांमध्ये समतोल असावा आणि असे म्हटले आहे की, मराठा जी समिती आहे त्यात इतर समाजाचे लोक आहेत तर त्यात कोण आहेत? गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कोणी नाही. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का? असं देखील यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.