BCCI चा नवा बॉस कोण? गृहमंत्री अमित शाहंसोबत बैठक; ‘या’ दिवशी होणार घोषणा
BCCI President : रॉजर बिन्नी यांच्यानंतर बीसीसीआयचा नवीन बॉस कोण होणार याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

BCCI President : रॉजर बिन्नी यांच्यानंतर बीसीसीआयचा नवीन बॉस कोण होणार याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बीसीसीआय अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे (BCCI) अधिकारी 20 सप्टेंबर रोजी दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांशी भेट घेणार आहे आणि याच दिवशी बीसीसीआय अध्यक्षपदाचा निर्णय देखील घेतला जाणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती क्रिकबझकडून देण्यात आली आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्यांची ही भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी होणार आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये हरभजन सिंग, कर्नाटकचे माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू रघुराम भट आणि माजी भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी, गणेश कोमकर हत्या प्रकरण; आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती सील
बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए.के. जोती यांच्या 6 सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार, “आक्षेपांवर तपासणी आणि निर्णय ( 2) अंतिम मतदार यादी जारी करण्याची” अंतिम तारीख 19 सप्टेंबर आहे. याचा अर्थ असा की राज्य संघटना पुढील 24 तासांत वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) त्यांचे नामांकित उमेदवार बदलू शकतात. त्यामुळे हरभजन सिंग, रघुराम भट आणि किरण मोरे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.