OBCs in Mumbai on September 1 Laxman Hake ultimatum to government : राज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यामध्ये वाद पेटलेला असतो. त्यातून ते सरकारवर देखील वारंवार निशाणा साधतात. यावेळी मात्र जरांगेंनंतर आता लक्ष्मण हाके यांनी देखील 1 सप्टेंबरला obc चे मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाला दिला आहे.
नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?
1 सप्टेंबरला ओबीसीचे मुंबईत राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. आम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिराव लागतेय आम्ही दहशतवादी आहोत का? 1 सप्टेंबरला शेवटच आंदोलन आम्ही करणार आहोत. तसेच हे आमचे शेवटचे आंदोलन असेल. असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. हाके म्हणाले, ओबीसी हा विखुरलेला आहे. ओबीसीची बाजू कोणीही घेत नाही. कालच महसूलमंत्र्यांनी सांगितले 22 लाख 20 हजार प्रमाणपत्र वाटली गेली आहे. शासनाने ओबीसींना विचारत घेतले नाही. या प्रमाणपत्राचा ओबीसींवर किती परिणाम होईल, याचा विचार विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. जनतेलाही हा विषय कळलेला नाही, असा प्रश्न पडला आहे. आम्ही आता थकललो आहे. आम्हाला पोलिस संरक्षण घेऊन फिरवा लागत आहे. कशासाठी पोलिस संरक्षण घेऊन फिरावे लागतंय ?आम्ही अतिरेकी आहोत ? गुंड आहोत, मवाली आहोत का ? असा सवाल हाके यांनी केलाय.
आम आदमी पक्षाची बी टीम की, पक्ष स्थापन करणार? दिपके म्हणाले, लोकांच्या मनात…
गरिबांचा निकष असेल, तर दहा टक्के एससीबीसी आरक्षण सरकारने का दिले आहे ? गरिबांचा निकष असेल तर इडब्लूएस का केले तुम्ही ? मराठा समाजातील गरिबांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचे असेल, तर ओबीसींमधील गरिबांचे काय मग ? मुळात सरकारने आरक्षणाला हेतूला हरताळ फासले आहे. आता सरकारी लढून झालंय. मनोज जरांगेंना अंगावर घेऊन झाले आहे. आम्ही ही लढाई जवळजवळ हरलो आहे. ओबीसींचे नेतेही, मंत्रीही बोलत नाहीत. एका बाजूने मराठा समाजाचे कमिटीच्या तेरा बैठका झाल्या. ओबीसींच्या कमिटीच्या दोन बैठका झाल्या आहेत. ओबींसीची आरक्षण संपलेले आहे. 1 सप्टेंबरला मुंबईला शेवटचे आंदोलन करणार आहे. हे शेवटचे आरक्षण असेल, असे हाके यांनी स्पष्ट केले आहे.
वेडा माणूस काही मागणी करतोय-वाघमारे
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. मनोज जरांगेंच्या हट्टापायी सरकारने कामकाज सुरू केले आहे. ते पूर्ण देशात कुठेही नाही. पुरोगामी महाराष्ट्रात सगळ्या सामाजिक न्यायाचा दमन करण्याची काम भाजपने सुरू केले आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना-राष्ट्रवादी असेल तिघांचे सरकार सगळे सामाजिक न्यायात कलंक आहे ओळखले जाईल. सामाजिक न्यायाचे पतन राज्यात होत आहे. जात ही बापाकडून येते. ती बदलता येत नाही, हा नियम आहे. हा कायदा आहे. पण सरकारकडे याने मागणी केली, जात बदलून मागितली आहे. आम्हाला मराठा म्हणायला लाज वाटतेय. आम्हाला कुणबी व्हायचे आहे. येडी लोक काहीही मागणी करतील, असे नवनाथ वाघमारे म्हणाले.
