मुंबईच्या राम मंदिर परिसरात मध्यरात्री दुर्घटना, शौचालयातील रासायनिक वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

सार्वजनिक शौचालयामध्ये विषारी रासायनिक वास पसरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 27T162554.122

Two die of suffocation due to chemical fumes : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयामध्ये विषारी रासायनिक वास पसरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राम मंदिर पूर्व येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळ, पारशी पंचायत गेटसमोरील सार्वजनिक शौचालयात गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 24 वर्षीय प्रभाकर धनीवर आणि 18 वर्षीय भावीन देसाई अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोघेही शौचालयात गेले असताना अचानक आतमध्ये तीव्र रासायनिक वास पसरला.

या वासामुळे दोघांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचा श्वास कोंडला. काही वेळातच दोघांची प्रकृती गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोन्ही तरुणांना शौचालयातून बाहेर काढून मध्यरात्रीच्या सुमारास जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी दोघांनाही मृत घोषित केलं.

दरम्यान, सार्वजनिक शौचालयामध्ये अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक वास कसा पसरला, नेमका कोणता विषारी वायू तयार झाला आणो त्याचा स्ट्रीट काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात आलेल्या रसायनांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याबाबत देखील तपासनंतरच स्पष्टता येणार आहे.

कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांचं वक्तव्य चर्चेत

विशेष म्हणजे शौचालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी दोन तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेच्या वेळी शौचालयात किंवा परिसरात नेमकी काय परिस्थिती होती, याची देखील माहिती घेतली जात आहे. विषारी वास जाणवल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने कोणती पावले उचलण्यात आली होती, याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे. या सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छता आणि देखभाल कोणाकडून केली जात होती, याबाबत देखील चौकशी होऊ शकते. या सर्व बाबींची माहिती समोर आल्यानंतरच दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर शौचालय परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यात येत असून संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे. शौचालयात कोणत्या प्रकारची रसायने वापरण्यात आली होती, याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे. तसेच विषारी वायू तयार होण्यामागे रासायनिक अभिक्रिया किंवा अन्य कोणते कारण होते का, हे देखील तपासातून स्पष्ट होणार आहे. दोन्ही तरुणांच्या मृत्यूचे निश्चित कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अहवाल देखील महत्वाचा ठरणार आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक शौचालयाची देखभाल आणि सुरक्षेबाबत देखील या घटनेनंतर प्रश उपस्थित होत आहेत. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. दोन तरुणांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि शौचालयात विषारी वायू कसा तयार झाला, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

follow us